जाकादेवी, चाफे, खंडाळा परिसरात लॉकडाऊनमुळे शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST2021-06-05T04:23:24+5:302021-06-05T04:23:24+5:30

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी, चाफे, खंडाळा परिसरात अत्यावश्यक सेवा सोडली तर इतर सर्व दुकाने पूर्णतः बंद असल्याने जाकादेवी, ...

Jakadevi, Chafe, Khandala area due to lockdown | जाकादेवी, चाफे, खंडाळा परिसरात लॉकडाऊनमुळे शुकशुकाट

जाकादेवी, चाफे, खंडाळा परिसरात लॉकडाऊनमुळे शुकशुकाट

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी, चाफे, खंडाळा परिसरात अत्यावश्यक सेवा सोडली तर इतर सर्व दुकाने पूर्णतः बंद असल्याने जाकादेवी, चाफे, खंडाळा परिसरात शुक्रवारी शुकशुकाट पसरला हाेता.

कडक लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत गर्दी करणारे ग्राहक घरीच राहिल्याने बाजारपेठेमध्ये नागरिकांची वर्दळ पूर्णतः थांबली आहे. डॉक्टर, मेडिकल, बँका या अत्यावश्यक सेवा सोडल्यास इतर सर्व दुकाने पूर्णतः बंद असल्याने अन्य नागरिकांचीही वर्दळ नगण्य आहे. बाजारपेठेतील अनेक बँका दुपारपर्यंत खुल्या असूनही बँकांमध्ये एक-दोन ग्राहकांशिवाय जास्त कोणीही येत नाही. जाकादेवी, चाफे, खंडाळा परिसरात पोलीस यंत्रणाही सज्ज असल्याने या कडक बंदला सर्व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातही तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे.

----------------------

जाकादेवी मुख्य बाजारपेठेमध्ये नागरिकांविना व वाहतुकीविना शुकशुकाट पसरला हाेता.

Web Title: Jakadevi, Chafe, Khandala area due to lockdown