शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

लोकांनी नियम धाब्यावर बसवल्याने पुन्हा लॉकडाऊन भोगण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 18:17 IST

शिथिलता दिल्यामुळेच नागरिकांनी नियम धाब्यावर बसवले. आज त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याचे निर्बंध आजपासून लागू केले जाणार आहेत. दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी अधिक कडक केली जाईल. नागरिकांनी सात दिवस निर्बंध पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

ठळक मुद्देलोकांनी नियम धाब्यावर बसवल्याने पुन्हा लॉकडाऊन भोगण्याची वेळउघड्या असणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येणार

रत्नागिरी : शिथिलता दिल्यामुळेच नागरिकांनी नियम धाब्यावर बसवले. आज त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याचे निर्बंध आजपासून लागू केले जाणार आहेत. दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी अधिक कडक केली जाईल. नागरिकांनी सात दिवस निर्बंध पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.कोरोना संदर्भातील जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आदी उपस्थित होते.सामंत यांनी आढावा घेताना सांगितले की, जिल्ह्यात काल १३२ कोरोना रुग्ण सापडले. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ५९९ आहेत. होम आयसोलेशनमध्ये २९३ तर ३०० उपचार घेत आहेत. जिल्ह्यात रुग्ण वाढत असल्याने जिल्हा महिला रुग्णालयात आणखी १२५ बेड वाढविण्यात आल्या आहेत. पालिकेच्या रुग्णालयात ५०, समाज कल्याणमध्ये १००तर बीएड कॉलेजमध्ये १००खाटा वाढविण्यात येणार आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासन पूर्ण सज्ज असून जादा बेड, आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड तयार ठेवण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले. तसेच पुरेसा ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.गेल्यावर्षी जशा खासगी शाळा ताब्यात घेतल्या होत्या. तशा यावेळीह घेतल्या जाणार आहेत. जिल्ह्यात आजपासून नव्या लॉकडाउनचे निर्बंध लागु केले आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलिस यंत्रणेला दिले आहेत. आजपासून नाकेबंदी केली जाईल. दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागु केली आहे. लॉकडाऊन काळात कृती समितीची भुमिका महत्वाची असून कृती समित्या जागृत करण्यात आल्या आहेत. गावात येणार्‍यांची कोरोना चाचणी झाली आहे की नाही, याची माहिती ते प्रशासनाला देणार आहेत. जिल्ह्यात सात दिवस कडक निर्बंध पाळा. प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यानंतर निर्बंध शिथिल करण्याच्या दृष्टीने विचार होईल, असे सामंत म्हणाले.कारवाई करणारनियमावलीनुसार अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व दुकाने बंद असणार आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाने आज फक्त जागृती मोहीम राबवली. मात्र, इतर उघड्या असणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी