रत्नागिरीत आयटीआयच्या जागा शिल्लक, विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी 

By मेहरून नाकाडे | Published: September 2, 2023 03:51 PM2023-09-02T15:51:32+5:302023-09-02T15:52:33+5:30

नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले

ITI seats remaining in Ratnagiri, admission opportunity for students | रत्नागिरीत आयटीआयच्या जागा शिल्लक, विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी 

रत्नागिरीत आयटीआयच्या जागा शिल्लक, विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी 

googlenewsNext

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात अद्याप ६५ जागांवर प्रवेश शिल्लक आहेत. कारपेंटरच्या १३, डेस्क टॉप पब्लिकेशनच्या १९, फूड प्रॉडक्शन व जनरलच्या ७, फ्रंट ऑफीस अटेंडसच्या १९, शिवणकामच्या ७ मिळून एकूण ६५ जागा अद्याप शिल्लक असून विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. डेस्क टॉप पब्लिकेशन, फूड प्रॉडक्शन व जनरल, फ्रंट आॅफीस अटेंडस हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे.

पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करूनही नोकरीची शाश्वती नसल्याने अनेक विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेत आहेत. एक ते दोन वषार्चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगार किंवा व्यवसायाची संधी उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील एकूण दहा आयटीआय असून २९३८ जागांपैकी २०९६ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे.

दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी दि.६ सप्टेंबर पर्यंत प्रवेशासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. दि.१२ सप्टेंबर रोजी शेवटचा समुपदेशन राऊंड शिल्लक आहे. त्यामुळे उर्वरित जागांवर प्रवेश पूर्ण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सात खासगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र असून ८८० प्रवेश क्षमता आहे. मात्र अद्याप २५४ जागांवरच प्रवेश झाले आहेत. तुलनेने खासगी आयटीआय कडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी आहे.

इलेक्ट्रीशन, मोटार मेकॅनिकल, वायरमन, फिटर, डिझेल मेकॅनिकल, वेल्डर, टर्नर, कॉम्युटर आॅपरेटर प्रोग्रॅम आॅफीसर, मेकॅनिकल ड्राफ्समन, सिव्हील ड्राफ्समन या ट्रेडंना मात्र वाढता प्रतिसाद असून प्रवेश पूर्ण झाले आहेत.

Web Title: ITI seats remaining in Ratnagiri, admission opportunity for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.