शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: नवीन घर बांधताय, मग झाडेही लावा!, घाणेखुंट ग्रामपंचायतीने घातली अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 17:01 IST

झाड न लावल्यास घरपट्टीची आकारणीच रद्द करण्याचा निर्णय

चिपळूण : तापमान वाढीवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धनाची लोकचळवळ उभी राहण्याची गरज आहे. यासाठी वृक्ष लागवडीची स्पर्धा घेतलेल्या खेड तालुक्यातील घाणेखुंट ग्रामपंचायतीने नव्या घराचे बांधकाम करताना झाडं लावलीच पाहिजेत, अशी नियमाने अट घातली आहे. झाड न लावल्यास घरपट्टीची आकारणीच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय शोषखड्डे बांधणेही केले बंधनकारक केले आहे.घाणेखुंटचे सरपंच राजू ठसाळे यांनी लोक हिताचे विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. विकास कामांसाठी शासकीय निधी सोबतच त्याला लोकसहभागाची जोड दिली आहे. घाणेखंट गाव एमआयडीसीच्या बाजूलाच असल्याने येथे प्रदूषण होतेच. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीवर त्यांनी भर दिला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात त्यांनी ग्रामस्थांसाठी वृक्ष लागवडीची स्पर्धा सुरू केली. याहीपुढे जाऊन प्रदूषणमुक्त गाव, ऑक्सिजन युक्त गाव व पर्यावरण पूरक गाव होण्यासाठी आणखी एक अनोखा निर्णय घेतला. नवीन घर बांधतेवेळी झाडे लावून ती जगविणे बंधनकारक केले आहे.ग्रामपंचायतीने तसा ठराव देखील केला आहे. त्यामुळे नवीन घराचे बांधकाम करताना देशी झाडे लावून ती जगवणे बंधनकारक राहणार आहे. एखाद्याने झाडे न लावल्यास त्यांच्या घराची घरपट्टी आकारणी केली जाणार नाही. यातून गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होऊन गावाचे निसर्ग सौदर्य वाढवण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे. शोषखड्डे नाहीत तर घरपट्टी आकारणी नाहीनवीन घर बांधताना झाडाबरोबरच ओला आणि सुक्या कचऱ्याचे विघटन होण्यासाठी शोषखड्डे उभारणे बंधनकारक केले आहे. हे शोषखड्डे न केल्यास घरपट्टीची आकारणी केली जाणार नाही. ज्यांनी शोषखड्डे बांधले नाहीत. त्यांची अद्याप आकारणी झालेली नाही. मात्र आता ग्रामस्थांमध्येही याविषयीची जागरूकता वाढत आहे. 

घाणेखुंट गाव प्रदूषणकारी औद्योगिक कारखान्यांच्या शेजारी असून त्याचे दूरगामी परिणाम यापूर्वी आम्ही भोगले आणि भविष्यातही भोगू. याचाच विचार करून आपल्या येणाऱ्या पिढीला किमान आपले जीवन सुस्थितीत जावे, यासाठी हा सगळा खटाटोप करीत आहे. बाकी सर्व दिनक्रम, जीवनक्रम चालू राहील, चढ उतार येत राहतील, पण सुजाण नागरिक म्हणून काही समाजाप्रती, निसर्गाप्रती, कुटुंबाप्रती जबाबदारी आपली पण आहे. - राजू उर्फ संतोष ठसाळे, सरपंच घाणेखुंट

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायत