शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा पावसाळ्यापूर्वी अशक्यच!, पाऊस पडताच काम थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 17:41 IST

सुमारे ७ लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन होते. आतापर्यंत सुमारे साडेचार लाख घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे.

संदीप बांद्रेचिपळूण : येथील वाशिष्ठी नदीतील सुमारे ७ लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, गाळ काढण्याच्या अखेरच्या टप्प्यात कामाची गती थंडावली आहे. आत्तापर्यंत ४ लाख ४५ हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी गाळाचे उद्दिष्ट पूर्ण होणे अशक्य बनले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे काम सुरू ठेवण्यात येणार आहे. पण, गाळ टाकण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चिपळूण शहर पूरमुक्त होण्यासाठी एक पर्याय म्हणून वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ काढण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. त्यासाठी चिपळूणवासीयांना तब्बल महिनाभर साखळी उपोषण छेडावे लागले. त्यानंतर चिपळुणात गाळ काढण्याच्या कामाला सारी यंत्रणा लागली होती. सुमारे ७ लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन होते. आतापर्यंत सुमारे साडेचार लाख घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात डिझेल चोरीचा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी अद्याप काेणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु, डिझेल चोरीच्या भानगडी उघड झाल्यावर चालकांची कमतरता जाणवली. टिपर चालकांना प्रति महिना सुमारे १४ ते १५ हजार अथवा प्रतिदिन ५०० रुपये वेतन मिळते. हे वेतनही महिन्याकाठी वेळेत मिळत नाही. कंत्राटी स्वरूपात चालक घेतले जातात. डिझेल चोरीच्या घटना, त्यातच कोणीही येऊन चालकांना शिव्या देणे, दमदाटी करणे आणि काम नियमित नसल्याने कामात अडथळे आले.येथील गाळ काढण्याचे काम यापुढे पावसाळा सुरू होईपर्यंत अर्थात १५ ते २० दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. तेवढ्या दिवसांकरिता कोणी चालक मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे सुमारे १२ ते १५ डंपर चालकांअभावी उभे आहेत. त्यामुळे कामाची गती मंदावली आहे. मात्र, नाम फाऊंडेशनने शिवनदीतील बहुतांशी गाळ काढण्याचे काम पूर्ण केल्याने नदीने मोकळा श्वास घेतला आहे. वाशिष्ठीतील कामासाठी मात्र अजून बराच वेळ जाणार हे स्पष्ट आहे.अंतिम टप्प्यात लगबगअखेरच्या टप्प्यात चोवीस तास काम सुरू ठेवण्याची हमी जलसंपदा विभाग कोकणचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी दिली होती. सुरुवातीला आणलेली यंत्रणा अन्यत्र हलविण्यात आली. चालक नसल्यानेही काही यंत्रणा पडून आहे. तुर्तास बहादूरशेख नाका गाळ उपाशाचे काम पूर्ण झाले असले तरी पेठमाप व उक्ताडला मोजकीच यंत्रणा कार्यरत आहे.

गाळासाठी जागेचा तुटवडावाशिष्ठी व शिवनदीतील काढलेला गाळ नागरिकांना मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, पूरबाधित भागात गाळ न टाकण्याची अट घातली. परिणामी याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शहरातील शासकीय व सार्वजनिक जागाही गाळाने भरल्या आहेत. शासकीय जागा शोधून तेथे गाळ टाकावा लागतो आहे. सद्यस्थितीत कळंबस्ते येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेत गाळ टाकला जात आहे. मात्र, काही गाळ १० ते १२ किलोमीटर अंतरावर नेऊन टाकावा लागत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfloodपूरChiplunचिपळुणriverनदी