शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील शिवसेनेचे चारही आमदार ‘रिचेबल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 18:30 IST

या चारही आमदारांनी आपण शिवसेनेसाेबतच असल्याचे स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत २९ आमदार ‘नाॅट रिचेबल’ असल्याने राज्यातील राजकारणात वादळ उठले आहे. शिवसेनेच्या आमदारांबाबत उलटसुलट चर्चा सुरु असतानाच रत्नागिरीतील शिवसेनेचे चारही आमदार मात्र ‘रिचेबल’ आहेत. या चारही आमदारांनी आपण शिवसेनेसाेबतच असल्याचे स्पष्ट केले आहे.विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटल्यानंतर नाराजीचे राजकारण सुरु झाले आहे. त्यानंतर साेमवारी सायंकाळपासून शिवसेनेचे ठाण्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ झाले होते. त्यांच्यासोबत जवळपास २९ शिवसेना आमदार ‘नॉट रिचेबल’ असल्याचे सांगण्यात येत आहे.  शिवसेना आमदार संपर्काच्या बाहेर गेल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे चारही आमदार सध्या कोठे आहेत, याची चर्चा रंगू लागली आहे.जिल्ह्यातील चारही आमदारांचे फाेन ‘संपर्क क्षेत्रात’ असल्याने साऱ्यांनाच हायसे वाटले आहे. प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता सर्वांनी पक्षासाेबतच असल्याचे सांगितले. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरीत मंगळवारी नियोजित दौरा होता. परंतु, सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर ते मुंबईतच तळ ठोकून आहेत.खेडचे आमदार योगेश कदम यांनी आपण शिवसेनेसोबत असून, आपल्या रक्‍तात शिवसेना आहे. त्यामुळे शेवटपर्यंत शिवसेनेसोबत राहणार असल्याचे सांगितले आहे.गुहागरचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनीही आपण चिपळुणात असून, शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेत असल्याचे सांगितले. आपला वरिष्ठांशी संपर्क झाला असून, वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणेच जी जबाबदारी खांद्यावर देतील ती पार पाडणार असल्याचे स्पष्ट केले.राजापूरचे आमदार राजन साळवी हे रत्नागिरीत येण्यासाठी निघाले होते. मात्र, सोमवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर ने पुन्हा मुंबईला रवाना झाले. आमदार साळवी यांच्या संपर्क साधला असता, आपण स्व. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. माझी निष्ठा ही बाळासाहेबांच्या पायाशी आहे. त्यामुळे शिवसेनेशिवाय आपण कधी विचारही करणार नाही. आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटण्यासाठी ‘वर्षा’ बंगल्यावर काही आमदारांसोबत जात असल्याचे सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना