नीलेश राणे प्रकरणाचा तपास डीवायएसपींकडे
By Admin | Updated: May 19, 2016 23:57 IST2016-05-19T23:49:31+5:302016-05-19T23:57:38+5:30
राणे यांना उच्च न्यायालयाने सोमवार दि. २३पर्यंत हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

नीलेश राणे प्रकरणाचा तपास डीवायएसपींकडे
चिपळूण : काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाण झालेल्या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे यांच्याकडे देण्यात आला आहे. चिपळूण येथे दि. २४ एप्रिल रोजी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सावंत यांना नीलेश राणे व अन्य चार साथीदारांनी मारहाण करुन अपहरण केले होते. याप्रकरणी पोलिसांनी नीलेश राणेवगळता अन्य चार आरोपींना अटक केली होती. नीलेश राणे यांना उच्च न्यायालयाने सोमवार दि. २३पर्यंत हजर होण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, वरिष्ठ पातळीवर तपासाबाबत हालचाली गतिमान झाल्या असून, वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे हा तपास देण्याच्या उद्देशाने तो उपविभागीय पोलीस अधिकारी गावडे यांच्याकडे सोपविला आहे. यामुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. (प्रतिनिधी)