यांत्रिक शेतीस मिळणार चालना

By Admin | Updated: January 3, 2015 00:00 IST2015-01-02T22:55:42+5:302015-01-03T00:00:59+5:30

कृषी विकास योजना : समूहगटांना मिळणार दहा लाख रुपयांचे अर्थसहाय्य

Introducing mechanical farming | यांत्रिक शेतीस मिळणार चालना

यांत्रिक शेतीस मिळणार चालना

रत्नागिरी : शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्याकरिता यांत्रिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात ३०० शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकरी गटांच्या माध्यमांतून आधुनिक यंत्रे खरेदीसाठी १०
लाख रु.पर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मालगुंड, केळ्ये, राजापूर, खेड येथील चार शेतकरी गटांना मोबाईल राईस मिल देण्यात आली आहे.कृषी उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत कृषी विभाग व आत्मातर्फे स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी गटांना सुलभ कर्ज पुरवठा, मजुरांची उपलब्धता, पेरणी ते काढणीपर्यंत आवश्यक असलेली यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात येते. या गटांच्या माध्यमातून सुमारे साडेचारशे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत आहे. गटांच्या माध्यमातून एकत्रित उत्पन्नाबरोबरच गटातील प्रत्येक सदस्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा उद्देश्य आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक गट रत्नागिरी, चिपळूण, दापोली, खेड या तालुक्यामध्ये आहेत.जिल्ह्यतील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यांना आधुनिक पध्दतीने शेती करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करणे शक्य होत नसल्यामुळे मनुष्यबळावर शेती केली जाते. परिणामी पिकांची लागवड होत नसल्याने उत्पादनात कमालीची घट होत आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या बचत गटांच्या धर्तीवर शेतकरी गट स्थापन करण्यात येत आहेत.शेतकरी गटाव्दारे शेतकऱ्यांना एकत्रित करुन आधुनिक शेती तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येते. त्याचप्रमाणे सामाजिक प्रश्नांची माहिती घेऊन शेतकऱ्यांचे वैयक्तिक प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाणार आहे.कृषी विभाग व आत्मातर्फे शेतकरी गटांसाठी प्रशिक्षण, अभ्यास दौरे, प्रक्षेत्र भेट, शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, तसेच शेतीवर आधारित उद्योग स्थापन करण्यासाठी विशेष सहकार्य करण्यात येत आहे.
कृषी उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या तीनशे श्रेणीतील २० गटांना प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. यामध्ये टेबल, कपाट आदी
साहित्य खरेदी करता येणार आहे. समूह शेतकरी गटात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे व्यक्तिगत उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Introducing mechanical farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.