पुणे येथे जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

By Admin | Updated: September 4, 2014 23:28 IST2014-09-04T23:19:42+5:302014-09-04T23:28:42+5:30

शासन व मंडळ : पर्यटन विकास महामंडळ घेणार लघुपट स्पर्धा

International Film Festival in Pune in January | पुणे येथे जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

पुणे येथे जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

रत्नागिरी : महाराष्ट्र शासन व पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या १३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव पुणे येथे ८ ते १५ जानेवारी २०१४ या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेसाठी नैसर्गिक ठेवा, मानवनिर्मित ऐतिहासिक ठेवा, महाराष्ट्राची संस्कृती असे तीन विभाग आहेत. प्रत्येक विभागात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे १ लाख, ५० हजार आणि २५ असे रोख पुरस्कार दिले जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यापुर्वी त्याबाबतची सर्व माहिती स्पर्धकांनी संकेतस्थळावर जाणून घ्यावी. स्पर्धकास दिलेल्या तीनही विभागात सहभागी होता येणार असून लघुपटासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचा उपयोग करता येईल. लघुपटाची वेळ मर्यादा कमीत कमी ३ मिनिटे किंवा १० मिनिटे यापेक्षा जास्त नसावी. महोत्सवाच्यावतीने नेमण्यात येणाऱ्या निवड समितीद्वारे प्रत्येक विभागात १० अंतिम लघुपट निवडले जातील. रोख पुरस्कार परिक्षकांच्या अंतिम निर्णयानुसार प्रदान केले जातील.
स्पर्धेसाठी आवश्यक माहिती ६६६.स्र्राा्रल्ल्िरं.ूङ्मे या संकेतस्थळावर उपलब्ध असून सहभागी होण्यासाठी प्रत्येक स्पर्धकास अर्जासोबत लघुपटाची डीव्हीडी व सेन्सॉर प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची तारीख १५ नोव्हेबंर २०१४ आहे. अधिक माहितीसाठी पर्यटन विकास महामंडळाच्या पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी केले आहे.
पुणे येथे होणाऱ्या या महत्वाच्या स्पर्धेसाठी मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: International Film Festival in Pune in January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.