वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:34 IST2021-09-23T04:34:45+5:302021-09-23T04:34:45+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मनरेगांतर्गत सन २०२२-२०२३ चा कृती आराखडा तयार करण्यासाठी शिवारफेरी गरजेची असून, ग्रामसभांनी आपापल्या गावात शिवारफेरी ...

वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मनरेगांतर्गत सन २०२२-२०२३ चा कृती आराखडा तयार करण्यासाठी शिवारफेरी गरजेची असून, ग्रामसभांनी आपापल्या गावात शिवारफेरी करताना असे वेळापत्रक तयार करण्याची मागणी होत आहे. आपला गाव आपला विकास याअंतर्गत मनरेगा योजना रत्नागिरी जिल्ह्यात राबविली जात आहे.
नेटवर्क मिळत नाही
चिपळूण : सहकार क्षेत्रातील विविध संस्थांच्या वार्षिक सभा आता ऑनलाईन होणार आहेत. या सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन होत असल्या तरी ग्रामीण भागात नेटवर्क मिळत नसल्याने सभासदांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. कोविड नियमावलीत ५० सभासदांची उपस्थिती अपेक्षित आहे.
रस्ता नादुरुस्त
रत्नागिरी : तालुक्यातील मजगाव-करबडे रस्ता नादुरुस्त झाला आहे. करबुडे व आजूबाजूच्या गावातून रत्नागिरीत नोकरी किंवा अन्य काही कामासाठी येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची रहदारी वाढली आहे. त्यासाठी हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
दुतर्फा झाडीमुळे अपघात
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील माखजन-धामापूर-करजुवे रस्त्याची खड्डे पडून दयनीय अवस्था झाली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडीमुळे वाहन चालकांना समोरून येणारे वाहन दिसून येण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मोकाट गुरांचा अडथळा
दापोली : आंजर्ले खाडी पुलावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांसह पुलावर ठाण मांडून बसलेल्या मोकाट गुरांचा अडथळा येत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे त्रस्त झाले आहेत. या खाडी पुलाला फार महत्त्व आहे. या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पुढे येत आहे.