गाणे-खडपोली रस्त्यावर पथदीप बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:34 IST2021-09-18T04:34:27+5:302021-09-18T04:34:27+5:30
चिपळूण : तालुक्यातील गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या अरुंद पुलाचे रुंदीकरण करावे आणि पिंपळी खुर्द ते गाणे - खडपोली या ...

गाणे-खडपोली रस्त्यावर पथदीप बसवा
चिपळूण : तालुक्यातील गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या अरुंद पुलाचे रुंदीकरण करावे आणि पिंपळी खुर्द ते गाणे - खडपोली या औद्योगिक वसाहतीच्या मार्गावर पथदीप बसवावेत, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पत्र दिले आहे.
याची दखल घेत उद्योग राज्यमंत्री तटकरे यांनी यासंदर्भात औद्योगिक वसाहतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रस्तावाची दखल घेण्याचा आदेश दिला आहे. गाणे - खडपोली एमआयडीसीकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. या मार्गावर दोन अरुंद पूल असून, या पुलावरून अवजड वाहतूक होत असते. त्यामुळे हे पूल कमकुवत झाले असून, या पुलांची रुंदी वाढविणे गरजेचे आहे. दोन्ही पुलांचे मजबुतीकरण व रुंदी वाढविल्यास औद्योगिक वसाहत व दसपटीकडे जाणाऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे, असे आमदार शेखर निकम यांनी म्हटले आहे.