शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सडलेल्या पोषण आहाराची चौकशीही वेळकाढूपणात सडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 13:32 IST

School kolhapur- रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्याना पुरवठा करण्यात येणारे पोषण आहाराचे धान्य निकृष्ठ असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणांची चौकशी सुरु होते. त्यामुळे ही प्रकरणे बासनात गुंडाळण्यात आले असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असलेल्या या प्रकारांकडे राज्य अन्न आयोग याकडे लक्ष कधी देणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसडलेल्या पोषण आहाराची चौकशीही वेळकाढूपणात सडलीराज्य अन्न आयोग याकडे लक्ष कधी देणार

रत्नागिरी : जिल्ह्यात प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्याना पुरवठा करण्यात येणारे पोषण आहाराचे धान्य निकृष्ठ असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणांची चौकशी सुरु होते. त्यामुळे ही प्रकरणे बासनात गुंडाळण्यात आले असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असलेल्या या प्रकारांकडे राज्य अन्न आयोग याकडे लक्ष कधी देणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.शालेय पोषण आहाराचे धान्य आणि अंगणवाड्यांमधील बालकांना पुरविण्यात येणारे पोषण आहाराचे धान्य निकृष्ठ असल्याचे उघडकीस आल्यानंतरही केवळ चौकशी लावून ते प्रकरण बासनात गुंडाळण्यात येत असल्याचे अनुभव जिल्हावासियांना गेल्या तीन चार वर्षात आले आहेत. त्यामुळे बालकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या धान्याचे ठेकेदार व पुरवठादार यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्यातील अंगणवाड्यांना महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कंझ्युमर फेडरेशनच्या माध्यमातून पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. चिपळूण तालुक्यातील खडपोली औद्योगिक वसाहतीमधील बंद कारखान्याच्या शेडमध्ये अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात येणारा पोषण आहाराचा सुमारे २५ टन साठा सडलेल्या अवस्थेत वर्षभरापूर्वी उघडकीस आला होता.

त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आमदार शेखर निकम यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती.. त्यावेळी एकात्मिक बाल विकास योजनेच्या विभागाने गोदाम सील केले तर अन्न व औषध प्रशासनाने निकृष्ट मालाचा पंचनामा केला होता. या प्रकरणाचीही चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.गतवर्षी जुलै महिन्यात रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे येथील शासकीय गोदामामध्ये अंगणवाड्याना पुरवठा करण्यात येणारे धान्यामध्ये कचरा तसेच ते धान्य निकृष्ठ दर्जाचे असल्याचे उघडकीस आले होते. त्यावेळी हे गोदामही सील करण्यात आले होते. तसेच अन्न व औषध प्रशासनाला तपासणीचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, हे प्रकरणही दाबण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.चौकशी होत नाहीरत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे आणि कुवारबांव प्राथमिक शाळेत पोषण आहाराचे धान्य निकृष्ट दर्जाचे सापडले होते. पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धान्याच्या गोदामाला भेट देऊन पाहणी केली होती. राजापूर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यांमध्ये शालेय पोषण आहाराचे धान्य निकृष्ट दर्जाचे समोर आले होते. पण पुढे काहीच झाले नाही.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रRatnagiriरत्नागिरी