शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

देवरूखनजीक टेम्पो उलटून अपघात, ९ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:17 IST

नजीकच्या पूर येथील एका वळणावर टेम्पो उलटून  झालेल्या अपघातात ९ जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. या सर्वांवर देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातग्रस्त टेम्पोचा चालक मात्र फरार झाला आहे. हा अपघात सोमवारी सायं. ७.१५ वाजताच्या सुमारास घडला. जखमीपैकी ६ जण मार्लेश्वर यात्रेला निघाले होते.

ठळक मुद्देदेवरूखनजीक टेम्पो उलटून अपघात, ९ जण जखमी देवरुख पोलीस ठाण्यात नोंद

देवरूख : नजीकच्या पूर येथील एका वळणावर टेम्पो उलटून  झालेल्या अपघातात ९ जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. या सर्वांवर देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातग्रस्त टेम्पोचा चालक मात्र फरार झाला आहे. हा अपघात सोमवारी सायं. ७.१५ वाजताच्या सुमारास घडला. जखमीपैकी ६ जण मार्लेश्वर यात्रेला निघाले होते.या अपघातात पूर्वा संदीप रहाटे (३२), साहेम संदीप रहाटे (८), संदीप जयराम रहाटे (३६), सुनिता सुनिल सावर्डेकर (६०), सुरेश बावू सावर्डेकर (६५), संदीप बळीराम गिम्हवणेकर (५५), समर्थ संदीप सावर्डेकर (८), मानवी संदीप गिम्हवणेकर (३५), हरिश्चंद्र्र प्रभाकर कदम (३८) हे जखमी झाले आहेत.ही घटना सोमवारी सायंकाळी ७. १५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर टेम्पो चालक फरार झाल्याने संताप व्यक्त होत आहे. निवळी फाटा येथे हे जखमी टेम्पोत बसले. त्यानंतर ते टेम्पोतून देवरुख येथे येत असताना पूर येथील एका वळणावर टेम्पो उलटून  अपघात झाला.या अपघातातील रहाटे हे नांदवज रहिवासी आहेत तर बाकीचे जखमी हे मुंबईतील रहिवासी आहेत. यापैकी रहाटे कुटुंब हे गणपतीपुळे येथून आपल्या नांदळज गावी येत होते तर गिम्हवणे व कदम हे मार्लेश्वर यात्रेला निघाले होते.या जखमींना पूर येथील भाऊ डोंगरे व ग्रामस्थांनी देवरुख ग्रमीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र ही घटना घडताच टेम्पो चालक फरार झाल्याने जखमींनी व पूर येथील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सायंकाळी उशीरा या घटनेची नोंद देवरुख पोलीस ठाण्यात करण्यात आली. जखमीपैकी चारजण गंभीर जखमी असून त्यांना रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी