कारच्या धडकेने सहाजणी जखमी

By Admin | Updated: May 29, 2014 00:43 IST2014-05-29T00:43:34+5:302014-05-29T00:43:47+5:30

जखमींमध्ये पाच विद्यार्थिनी, एक गंभीर

The injured in the car hit the vehicle | कारच्या धडकेने सहाजणी जखमी

कारच्या धडकेने सहाजणी जखमी

रत्नागिरी : शहरातील गोेगटे जोगळेकर महाविद्यालयाजवळ एका 'ुंदाई कारने (क्र. एमएच०८ झेड ३५३२) रस्त्याच्या कडेने चालणार्‍या ५ विद्यार्थिनींसह सहा जणींना धडक दिली. त्यात उर्वी उदय पैठणकर (२०, रा. मालाड, मुंबई, सध्या रा.रत्नागिरी) ही गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. उर्वी ही मुंबईत शिक्षण घेत असून ती आपल्या आईला घेऊन महाविद्यालयात आली होती. त्यानंतर आपल्या अन्य मैत्रिणी व आईसह ती परत निघाली असता महाविद्यालयाजवळील मुलींच्या वसतीगृहाजवळ एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात उर्वी हिच्या उजव्या पायाला व उजव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यासमवेत गाडीने धडक दिल्याने उत्सवी विलास नार्वेकर (२०, रत्नागिरी), अनुप्रिता पवार, कार्तिकी पिलणकर, उर्वीची आई रेखा व फगरे अशा पाचजणी किरकोळ जखमी झाल्या. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यात रत्नागिरीत वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. बेदरकारपणे गाड्या चालविणार्‍यांमुळेच अपघात वाढल्याची चर्चा असून याबाबत उपप्रादेशिक परिवहन खात्याने, वाहतूक पोलिसांनी मोहीम राबविण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The injured in the car hit the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.