पोलिसांची तरुणांना अमानुष मारहाणलोकमत न्यूज नेटवर्क

By Admin | Updated: May 9, 2017 23:21 IST2017-05-09T23:21:46+5:302017-05-09T23:21:46+5:30

पोलिसांची तरुणांना अमानुष मारहाणलोकमत न्यूज नेटवर्क

Inhuman marital news network of police youth | पोलिसांची तरुणांना अमानुष मारहाणलोकमत न्यूज नेटवर्क

पोलिसांची तरुणांना अमानुष मारहाणलोकमत न्यूज नेटवर्क


रत्नागिरी : हातखंबा येथून जेवण करून घरी परतत असलेल्या पाच तरुणांना ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली़ याबाबत पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांना बहुजन समाज पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे़ या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत़ या मारहाणीला बळी पडलेल्या पाचही तरुणांना अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़
योगेश विजय आयरे, लवेश विजय आयरे, अक्षय भाटकर, अनिकेत अनिल कदम व वृषभ आलीम (परटवणे, रत्नागिरी) हे पाच मित्र हातखंबा येथे जेवण करण्यासाठी गेले होते़ जेवण आटोपून ते सोमवारी मध्यरात्री घरी येण्यासाठी निघाले़ त्यावेळी कारवांचीवाडी येथे गस्तीला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडले़ त्यांना ग्रामीण पोलीस ठाण्यात नेऊन थर्ड डिग्रीचा वापर करून मारहाण केली़ त्यावेळी लवेश आयरे व योगेश आयरे यांच्या आईने त्यांना फोन करण्याचाही प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी त्यांचे मोबाईल स्विच आॅफ करून ठेवले होते़
रात्रभर नवनवीन पोलीस येऊन या पाच तरुणांची धुलाई करत होते, तर जुने पोलीस नवख्या पोलिसांना आरोपींना कसे मारायचे, यांची प्रात्यक्षिके करून दाखवित होते़ त्यामुळे पोलिसांच्या खेळात या पाचहीजणांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. मध्यरात्री २ ते ५ यावेळेत या पाचही तरुणांना बेदम मारहाण करून सकाळी सोडून देण्यात आले़ त्यांची बाईक, एटीएम कार्ड व सोन्याचे ब्रेसलेट पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले़
पोलिसांच्या माराने घाबरलेले हे तरुण कारवांचीवाडी ते परटवणे चालत आले़ त्यांच्या अंगावरील खाणाखुणा पाहून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना विचारणा केली़ त्यावेळी त्यांनी घडलेला सर्व
प्रसंग सांगितला़ त्यामुळे या पाचही तरुणांना अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले़

Web Title: Inhuman marital news network of police youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.