शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

हमखास उत्पन्न देणारे ‘पांढरे सोने’ काळवंडले; फुलकिड्यांमुळे काजूला फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 18:19 IST

फवारणी खर्चाने जीवाला चटका

रत्नागिरी : ‘पांढरे सोने’ म्हणून जिल्ह्याला हमखास उत्पन्न देणाऱ्या काजू पिकाला हवामानाची मोठी झळ बसली असून, उत्पादनात मोठी घट झाली आहे. काजूवर फुलकिडे, टीम माॅस्क्युटो रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे यावर्षी ४० ते ५० टक्के इतकेच उत्पादन आहे. यावर्षी गावठी काजूसाठी १०५ तर वेंगुर्ला ४ व ५ साठी ११५ रुपये दर दिला जात आहे. उत्पादन कमी असल्याने दर वाढवून मिळावा किंवा हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.ओल्या काजूगर विक्रीबरोबर वाळविलेल्या काजू बीची विक्री करून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळते. गावठी काजूबरोबर कोकण कृषी विद्यापीठ प्रमाणित वेंगुर्ला ४ व ५ या वाणाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, सुरुवातीपासून फुलकिडे (थ्रीप्स), टीम माॅस्क्युटो रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे काजू पिकावर कीडरोग प्रतिबंधात्मक फवारणी करावी लागली. काही ठिकाणी फवारणी करूनही शेतकरी फुलकिड्यावर नियंत्रण मिळवू शकले नसल्यामुळे काजू बीच्या टरफलावर काळे डाग पडून बिया काळवंडल्या आहेत.

हवामानातील बदलामुळे यावर्षी काजूचे उत्पादन घटले असून, उत्पादन व खर्च यांचा मेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. प्रक्रिया केलेल्या काजुगराचाही उठाव होत नसल्याने प्रक्रिया उद्योग धोक्यात आला आहे. शासनाकडून काजूला योग्य हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. काजू बोंडावर तसेच टरफलावर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्यामुळे ते मातीमोल होते. अशा प्रक्रिया व्यवसायांना चालना मिळणे आवश्यक आहे.

आयातीमुळे स्थानिक उत्पादनावर परिणामविविध प्रक्रिया उद्योगांसाठी काजुगरांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. काजूवरील तुलनात्मकदृष्ट्या कमी असलेले आयात कर व अन्य करांमुळे परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या काजूचा दर देशातील काजूच्या तुलनेने कमी असतो. त्यामुळे सिंगापूर, आफ्रिका, ब्राझील, व्हिएतनाम या देशांमधून मोठ्या प्रमाणावर काजू बी भारतात आयात केली जाते. याचा प्रतिकूल परिणाम देशी काजू बीच्या खरेदीवर होत आहे.

  • काजूचे एकूण क्षेत्र १ लाख १० हजार हेक्टर
  • काजूचे उत्पादन हेक्टरी ३ टन
  • वार्षिक उलाढाल १५० कोटी
  • काजू बोंड निर्मिती ६० टक्के

काजू पिकावरील संकटे

  • प्रतिकूल हवामानामुळे व्यवस्थापन खर्चात वाढ
  • खते, फवारणी खर्चात वाढ, पण काजू बी दर अल्प
  • मनुष्यबळाचा अभाव
  • कमी असलेल्या आयात करामुळे परदेशी काजूचा दर कमी
  • जादा दरामुळे स्थानिक काजूपेक्षा परदेशी काजूला मोठी मागणी
  • मोठ्या कंपन्या, व्यापाऱ्यांकडून कमी दराने काजू खरेदी

हवामानातील बदलाचा परिणाम काजू पिकावरही होऊ लागला आहे. कीडरोगापासून संरक्षण करण्यासाठी आंब्याप्रमाणे कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. उत्पादनासाठी खर्च वाढला आहे. तुलनेने अपेक्षित दर मिळत नसल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने काजूला हमीभाव जाहीर करावा. - रोहित कळंबटे, रत्नागिरी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी