उद्योगांनादेखील आता आधार ज्ञापन

By Admin | Updated: October 19, 2015 23:50 IST2015-10-19T22:40:47+5:302015-10-19T23:50:28+5:30

केंद्र शासन : आॅनलाईन पध्दतीने दाखल करावे लागणार

Industries should now have a memorandum of support | उद्योगांनादेखील आता आधार ज्ञापन

उद्योगांनादेखील आता आधार ज्ञापन

रत्नागिरी : उद्योजकांनी आता ईएम भाग - १ व भाग - २ ऐवजी उद्योग आधार ज्ञापन केंद्र शासनाच्या पोर्टलवर करणे आवश्यक करण्यात आले आहे. हे आधार ज्ञापन आॅनलाईन पध्दतीने दाखल करावयाचे आहे. काही अपवादात्मक प्रकरणामध्ये आॅनलाईन ज्ञापन दाखल करणे शक्य नसेल तर परिशिष्ट - १ मध्ये महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडे अर्ज सादर करता येणार आहे. या उद्योगाचे आधार ज्ञापन जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आॅनलाईन दाखल करण्यात येईल.उद्योजकाने परिशिष्ट - १ मध्ये उद्योग आधार ज्ञापन आॅनलाईन सादर केल्यानंतर, परिशिष्ट - २ च्या नमुन्यात वेब पोर्टल प्रणालीद्वारे तयार करण्यात आलेल्या उद्योग आधार ज्ञापन स्वीकृतीपत्राची प्रत उद्योग आधार ज्ञापनमध्ये नमुद केलेल्या ई - मेलवर पोर्टल प्रणालीद्वारे पाठवण्यात येणार आहे. ज्या विद्यमान उद्योगांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम विकास अधिनियम - २००६ अंतर्गत ईएम भाग - १ व भाग - २ घेतलेले असतील किंवा सूक्ष्म, लघुउद्योग नोंदणी घेतलेली असेल अशा उपक्रमास पुन्हा उद्योग आधार ज्ञापन सादर करण्याची आवश्यकता नाही. तथापि, एखाद्या उपक्रमास पुन्हा उद्योग आधार ज्ञापन सादर करावयाची इच्छा असल्यास असे उपक्रमसुध्दा उद्योग आधार ज्ञापन सादर करु शकतील. उद्योग आधार ज्ञापनामध्ये, मालकी तत्वावरील उपक्रमाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. भागीदारी तत्वावरील उपक्रमाने त्यांच्या अधिकृत भागीदाराचा आधार क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. इतर उपक्रमांच्या संदर्भात एखाद्या अधिकृत व्यक्तीचा आधार क्रमांक नमूद करावा. एकाच आधार क्रमांकाचा वापर करुन कितीही उद्योग आधार ज्ञापन दाखल करता येईल. यावर कुठल्याही मर्यादा नाहीत, असे कळवण्यात आले आहे.उद्योग आधार ज्ञापन आॅनलाईन दाखल करतेवेळी कोणत्याही प्रकारची अनुषंगिक दस्तावेज सादर करण्याची, अपलोड करण्याची आवश्यकता नाही. तथापि, या संदर्भात केंद्र शासनाने, राज्य शासनाने अधिकृत केलेल्या व जेथे आवश्यक आहे अशा प्रकरणी उद्योजकांकडून कागदोपत्री पुरावा मागितला जाणार असल्याचे कळवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Industries should now have a memorandum of support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.