रेशन दुकानासाठी १ मेपासून बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST2021-04-24T04:31:50+5:302021-04-24T04:31:50+5:30

दाभाेळ : रेशन दुकान आणि पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात भाजपच्या उत्तर रत्नागिरी महिला मोर्चा अध्यक्ष स्मिता जावकर १ मे ...

Indefinite fast for ration shop from 1st May | रेशन दुकानासाठी १ मेपासून बेमुदत उपोषण

रेशन दुकानासाठी १ मेपासून बेमुदत उपोषण

दाभाेळ : रेशन दुकान आणि पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात भाजपच्या उत्तर रत्नागिरी महिला मोर्चा अध्यक्ष स्मिता जावकर १ मे रोजी दापोली तहसीलदार कार्यालयासमोर दाभोळ येथील महिला कार्यकर्त्यांसोबत कोविडचे नियम पाळून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. या उपोषणाला श्याम दाभोळकर, संतोष कृष्णा दाभोळकर आणि दाभोळ परिसरातील असंख्य रेशन कार्डधारकांनी पाठिंबा दिला आहे.

मागील कोरोनाच्या काळात दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी काही कारणास्तव दाभोळ येथील तीनही रेशन दुकाने बंद करून दि. २८ एप्रिल २०२०पासून वणौशी या ठिकाणी चालविण्यास दिली. त्यामुळे दाभोळ येथील ग्रामस्थांना गेले वर्षभर काेरोना काळात धान्य आणण्यासाठी ७ ते ८ किलोमीटर लांब जावे लागत आहे. त्यासाठी किमान दोन ते तीन वेळा फेऱ्या माराव्या लागतात. ऑनलाईन व्यवहार असल्याने कधी नेटचा प्रॉब्लेम आहे, तर पॉस मशीनच्या अडचणी. त्यासाठी लोकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.

दिनांक १८ जुलै २०२० रोजी दाभोळ गावातील तीनही रेशनदुकानांच्या नवीन जाहीरनाम्याची प्रक्रिया तालुका पुरवठा विभागाकडून पूर्ण झाली आहे. तीनही रेशन दुकाने दाभोळ या ठिकाणी यावी, त्याकरिता स्मिता जावकर यांनी पुरवठा विभागाकडे मागणी अर्ज करून एक वर्ष झाले आहे. मात्र, त्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्याचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. दाभोळच्या ग्रामस्थांना गावातच रेशन दुकान मिळावे, यासाठी उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे.

Web Title: Indefinite fast for ration shop from 1st May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.