रत्नागिरी आगारातर्फे ग्रामीण व शहरी मार्गावरील फेऱ्यांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:36 IST2021-05-25T04:36:07+5:302021-05-25T04:36:07+5:30
रत्नागिरी : लाॅकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा म्हणून एस. टी. परवानगी देण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे ...

रत्नागिरी आगारातर्फे ग्रामीण व शहरी मार्गावरील फेऱ्यांमध्ये वाढ
रत्नागिरी : लाॅकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा म्हणून एस. टी. परवानगी देण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील मोजक्याच फेऱ्या सुरू होत्या. मात्र संभाव्य प्रवासी भारमान असलेल्या मार्गावर फेऱ्या वाढविण्याचा निर्णय रत्नागिरी आगाराने घेतला आहे.
आगामी पावसाळा, शेतीची कामे, ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. प्रवासी प्रतिसाद पाहून ग्रामीण व शहरी मार्गावरील फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. ग्रामीण मार्गावर यापूर्वी १३ गाड्यांद्वारे १०४ फेऱ्या व शहरी मार्गावर ६ गाड्यांद्वारे १०० फेऱ्या सुरू होत्या. मात्र सोमवारपासून ग्रामीण मार्गावर नवीन २३ गाड्यांद्वारे १५२ फेऱ्या, तर शहरी मार्गावर नवीन १० फेऱ्याद्वारे १६० फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह प्रवासी वाहतूक केली जाणार आहे.
ग्रामीण मार्गावर गणपतीपुळे, मालगुंड, चिपळूण, नेवरे (बाजारपेठ), दापोली, पावस, गावखडी गुरववाडी, नाटे, हर्चे-पिंपळपार, आंबोळगड, स्वामी नाखरे कालकरकोंड, भडे, काजरघाटीमार्गे लांजा, रिंगीची वाडी, जयगड, गणपतीपुळे, करबुडे, जाकादेवी, धामणसे, देवळे, पाली, वळके, साखरपा, देवरूख व ओशी आदी गावांतील फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
शहरी मार्गावर भावेआडोम, दांडेआडोम, मजगाव, फणसवळे, आंबेकोंड, म्हामुरवाडी, मजगाव, वेसुर्ले, हातीस, टिके-कांबळेवाडी, टेंभ्येपूल, तारवेवाडी, निवळी, खेडशी-फणसवळे, खेडशीनाका, कोतवडे, आरे-बसणी, काळबादेवी, सडामिऱ्या, मिऱ्याबंदर, कोळंबे, उफळवाडी, रेल्वेस्टेशन, वायंगणी, काजरघाटी, हातखंबा गावच्या फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत.