शाळांची गुणवत्ता वाढवा

By Admin | Updated: October 13, 2015 00:12 IST2015-10-12T21:22:27+5:302015-10-13T00:12:49+5:30

ऐश्वर्या घोसाळकर : वालोपे शाळेचा अमृत महोत्सव

Increase the quality of schools | शाळांची गुणवत्ता वाढवा

शाळांची गुणवत्ता वाढवा

चिपळूण : मराठी शाळांच्या कमी होत चाललेल्या पटसंख्येचा विषय चिंंतेची बाब आहे. पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत आहेत. पालकांचा ओढा खासगी शाळांकडे का आहे? हे लक्षात घेऊन मराठी शाळांनी त्याप्रमाणे आपलीही गुणवत्ता वाढवली तर मराठी शाळांची पटसंख्याही वाढेल, असा विश्वास जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांनी व्यक्त केला. चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, वालोपे नं. १चा अमृत महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिपळूण-संगमेश्वरचे आमदार सदानंद चव्हाण होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास सुर्वे, शिवसेनेचे पंचायत समितीमधील गटनेते अभय सहस्त्रबुध्दे, पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम, शशिकांत चाळके, गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण, केंद्रप्रमुख सायली शिंंदे, वालोपेच्या सरपंच मयुरी मूरकर, उपसरपंच रवींद्र तांबिटकर, शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा संदे, प्रेरणा जाधव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अस्मिता आयरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक आयरे, झोलाईदेवी देवस्थानचे खोत - मानकरी पांडुरंग आयरे, कळंबस्तेच्या सरपंच आशा राक्षे, उपसरपंच विवेक महाडिक, दळवटणेचे सरपंच शेट्ये आदी उपस्थित होते.
यावेळी गटनेते अभय सहस्त्रबुध्दे, माजी सभापती शौकतभाई मुकादम, गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण, केंद्रप्रमुख सायली शिंंदे, पदवीधर शिक्षिका प्रेरणा जाधव, निवृत्त मुख्याध्यापक उदेग, तांबे, तिवरेकर गुरूजीं यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक करताना अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र तांबिटकर यांनी शाळेच्या पंच्याहत्तर वर्षांच्या कालावधीचा आढावा घेतला. याप्रसंगी सर्व मान्यवरांचा जास्वंदीचे रोप व श्रीफळ देऊन आगळ्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. अमृत महोत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन सदानंद चव्हाण व सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला आर. सी. काळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रामप्रसाद कान्हेरे, शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक तांबे, उदेग, तिवरेकर, पिंंपुटकर गुरूजी तसेच सावंत, तांबे, पिंंपुटकर, नागेश आदी शिक्षिका, अमृत महोत्सव समितीचे दिलीप मयेकर, मंगेश मुरकर, अंकुश नागवेकर, राजेंद्र टाकळे, विलास पवार, शांताराम जाधव, शंकर जाधव, धोंडिराम कदम, मोहन सुर्वे, सुभाष मयेकर, रविंउदय आयरे, सोनल आयरे, मंगला देवळेकर, प्रिया शिर्के, बाळकृष्ण कदम, सायली जाधव, समृध्दी वालोपकर, प्रभा शिंंदे, गामसेवक गावडे, कृषी सहाय्यक उमा जाधव, दत्ताराम आयरे उपस्थित होते. संदेश पवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


चिंतेची बाब : शाळांची पटसंख्या वाढेल
मराठी शाळांमधून विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत चालली आहे. पालकांचा ओढा खासगी शाळांकडे अधिक आहे. हा ओढा वाढण्याचे नेमके कारण काय आहे? याचा विचार केला पाहिजे. मराठी शाळांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ऐश्वर्या घोसाळकर यांनी सांगितले.



पटसंख्या रोडावली
जिल्हा परिषद मराठी माध्यमाच्या शाळांमधून पटसंख्या कमी होत चालली आहे. हा चिंतेचा विषय असून, शाळा ओस पडू लागल्या आहेत.

Web Title: Increase the quality of schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.