शेंगदाण्याच्या दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:31 IST2021-09-11T04:31:47+5:302021-09-11T04:31:47+5:30
आयटीआरसाठी मुदतवाढ रत्नागिरी : आर्थिक वर्ष २०२०-२१ चे प्राप्तिकर विवरणपत्र (इनकम टॅक्स रिटर्न) सादर करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ ...

शेंगदाण्याच्या दरात वाढ
आयटीआरसाठी मुदतवाढ
रत्नागिरी : आर्थिक वर्ष २०२०-२१ चे प्राप्तिकर विवरणपत्र (इनकम टॅक्स रिटर्न) सादर करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. वैयक्तिक करदात्यांना दि. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत विवरणपत्र सादर करता येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.
भात पसवले
रत्नागिरी : तालुक्यातील गोळप परिसरात योग्य वेळी पेरणी केल्यानंतर नियमित पडणाऱ्या पावसामुळे भात पीक लागवड करण्यात आली होती. वेळेवर भात लागवडीची कामे पूर्ण झाल्यामुळे हळवी भात पिके पसवली आहेत. दाणे भरण्याच्या अवस्थेत असून, महिना दीड महिन्यात भात कापणीला तयार होणार आहे. मात्र, पावसाचे प्रमाण कमी येणे गरजेचे आहे.
तिकीट तपासणी सुरू
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव कालावधीत २२४ जादा रेल्वे गाड्या धावत आहेत. अशावेळी अनधिकृत प्रवाशांना आळा घालण्यासाठी स्थानकांवर व गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी केली जाणार आहे. अतिरिक्त सुरक्षेसाठी, गर्दी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी आरसीएफ कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त रेल्वे सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.
आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी : जिल्हा परिषद सेवानिवृत्तांचे वेतन अनियमित होत असून, बहुदा २० तारखेनंतरच दिले जाते. याबाबत शासनाला वारंवार स्मरणपत्र देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा परिषद कर्मचारी व सेवानिवृत्त संघटनेतर्फे मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.