शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

फसवणुकीच्या घटनात वाढ, रत्नागिरी जिल्ह्यात तीन महिन्यांत ९ जणांना ७७ लाखांचा गंडा

By अरुण आडिवरेकर | Updated: March 27, 2023 18:13 IST

शिक्षणाने आपण कितीही प्रगत झालाे, कितीही ज्ञानाच्या गाेष्टी केल्या तरी या ना त्या कारणाने काेणीतरी आमिष दाखवताे आणि आपण फसताे

अरुण आडिवरेकररत्नागिरी : शिक्षणाने आपण कितीही प्रगत झालाे, कितीही ज्ञानाच्या गाेष्टी केल्या, आजूबाजूच्या घटनांकडे पाहत असलाे तरी या ना त्या कारणाने काेणीतरी आमिष दाखवताे आणि आपण फसताे. रत्नागिरी जिल्ह्यात फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत हाेत असून, गेल्या तीन महिन्यांत ९ जणांना तब्बल ७७ लाख १४ हजार ४५४ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.खेड तालुक्यातील थिच्चूर पद्मनाभन क्रिश्नन (५७, रा. लाेटे, खेड, मूळ रा. कर्नाटक) यांनी फसवणूक झाल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. फाॅरेक्स ॲण्ड कमाेडिटी मार्केटमध्ये गुंतवलेले असून, त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ, अशी खाेटी आश्वासने देण्यात आली हाेती. त्यानंतर थिच्चूर यांनी बॅंक ऑफ इंडिया, ॲक्सिस बॅंक आणि एचडीएफसी बॅंक अशा तीन बॅंकांच्या खात्यावर पैसे पाठविले. हे पैसे मेटा ट्रेडर - ५ इव्हेलाेसिटी लि. यामध्ये गुंतवले. त्यानंतर पैसे परत करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला.

मात्र, पैसे न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी खेड पाेलिसांनी राहुल पांडे (पूर्ण नाव, गाव माहीत नाही), तारा (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) आणि प्रणव शर्मा (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) या तिघांवर २५ मार्च राेजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खेडमधील हा प्रकार नव्याने समाेर आलेला असला तरी गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील ९ जणांना विविध प्रकारे गंडा घालून त्यांच्याकडील रक्कम हडप करण्यात आली. जिल्ह्यातील या घटनांमध्ये वाढत हाेतच असून, या घटनांनंतरही नागरिक जागृत हाेत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये शिकलेल्या व्यक्तीही फसत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कुरिअर मिळविण्यासाठीपरत गेलेले कुरिअर थांबविण्यासाठी उमरे (ता. रत्नागिरी) येथील प्राैढाने तब्बल ९९ हजार गमावले हाेते. या प्राैढाला लिंक पाठविण्यात आली हाेती. त्यानंतर ऑनलाइन गंडा घालण्यात आला.

राेजगाराच्या नावाखालीघरबसल्या राेजगार मिळवून देताे, असे सांगून जिल्ह्यातील १५१ महिलांना तब्बल ७२ हजार ६०१ रुपयांना चुना लावण्यात आला. याप्रकरणी जळगावातील एका ठकसेनला गुहागर पाेलिसांनी अटक केली आहे.

नाेकरीच्या बहाण्याने

  • नाेकरीचे आमिष दाखवून देवरुखातील एका तरुणाला १२ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. या तरुणाने आईवडिलांच्या खात्यातून हे पैसे गुगल पेद्वारे पाठविले हाेते.
  • नाेकरी डाॅट काॅम कंपनीचा अधिकारी बाेलताेय सांगून, देऊड-चिंचवाडी (ता.रत्नागिरी) येथील तरुणाला १२ लाख ४० हजार ७३९ रुपयांना गंडा घालण्यात आला. या प्रकरणी चाैघांवर गुन्हा दाखल केला आहे.

वीजबिल थकल्यानेरत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील प्राैढाला वीजबिल थकल्याचा खाेटा मेसेज आला. त्यांनी त्या मेसेजमधील क्रमांकावर संपर्क साधला असता, तब्बल ५ लाखांचा गंडा घालण्यात आला.

गिफ्ट लागल्याचे सांगूननागावे (ता.चिपळूण) येथील तरुणीला आपण अर्थ कंपनीचे ग्राहक असून, गिफ्ट लागल्याचे सांगण्यात आले. या बक्षिसापाेटी या तरुणीने अवघ्या तीन तासांत तब्बल ७८,१८५ रुपये गमावले.

पार्ट टाइम जाॅबपार्ट टाइम जाॅब देताे सांगून, चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील तरुणाची १३ लाख १५ हजार ५३४ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

फसवणुकीचा नवा फंडाहाॅटेलमध्ये राहायचे, मस्त खायचे, माैजमजा करायची आणि बिल न देता निघून जायचे, असा नवा फसवणुकीचा प्रकार समाेर आला आहे. चिपळूण आणि दापाेली येथे असे प्रकार घडले असून, चिपळुणात ७२ हजार, तर दापाेलीत ३४,४३५ रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पंजाबमधील दाेघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

अशीही फसवणूकउज्ज्वला गॅस कनेक्शन देताे सांगून, दापाेलीकरांना गंडा घालण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला. या प्रकरणी चंद्रपूर, नांदेड, बीडमधील सहा जणांना अटक केली आहे.

हे टाळा

  • माेबाइलवर आलेली काेणतीही लिंक खात्रीशिवाय ओपन करू नका.
  • काेणत्याही मेसेजला रिप्लाय देऊ नका.
  • पॅन नंबर, आधार नंबर, ओटीपी काेणालाही देऊ नका.
  • काेणत्याही आमिषाला बळी पडू नका.
  • महावितरण अथवा बॅंकेच्या नावाखाली येणाऱ्या बनावट फाेनला प्रतिसाद देऊ नका.

संपर्क साधाकाेणत्याही प्रकारचा बनावट फाेन आल्यास अथवा मेसेज आल्यास संबंधित कार्यालयाशी थेट संपर्क साधावा.फसवणूक झाल्यास जवळचे पाेलिस स्थानक किंवा सायबर पाेलिस स्थानकात तत्काळ संपर्क साधावा.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी