खेडमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ; नगरपरिषदेकडून सर्वेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:29+5:302021-06-30T04:20:29+5:30

खेड : एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असतानाच, खेडमध्ये डेंग्यूच्या साथीनेही डोके वर काढल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या ...

Increase in dengue patients in Khed; Survey started by the Municipal Council | खेडमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ; नगरपरिषदेकडून सर्वेक्षण सुरू

खेडमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ; नगरपरिषदेकडून सर्वेक्षण सुरू

खेड : एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असतानाच, खेडमध्ये डेंग्यूच्या साथीनेही डोके वर काढल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याने, नगरपरिषद प्रशासन सतर्क झाले आहे. मंगळवारपासून घराेघरी जाऊन सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने, नगर प्रशासनाची धास्ती वाढली आहे. त्यात डेंग्यूच्या साथीची भर पडल्याने प्रशासनाची चिंता आणखीन वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत. नगरपरिषद प्रशासनाने फवारणी व पावडर मारण्याचे काम हाती घेतले आहे, तसेच घराेघरी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सांगितले. नागरिकांनीही सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. आपल्या घराभोवती साचलेल्या पाण्याची साफसफाई करुन परिसर स्वच्छ ठेवल्यास डेंग्यू साथीचा फैलाव होणार नाही. सर्वेक्षण मोहिमेस नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहनही नगराध्यक्ष खेडेकर यांनी केले आहे.

---------------------------

खेड शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने नगरपरिषद प्रशासनाकडून शहरात फवारणी करण्यात येत आहे.

Web Title: Increase in dengue patients in Khed; Survey started by the Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.