गेल्या तीन दिवसांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST2021-09-11T04:32:42+5:302021-09-11T04:32:42+5:30
लांजा : मागील चार दिवस कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट होत असतानाच, गेल्या तीन दिवसांमध्ये काेराेनाचे १४ रुग्ण आढळले आहेत. ...

गेल्या तीन दिवसांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ
लांजा : मागील चार दिवस कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट होत असतानाच, गेल्या तीन दिवसांमध्ये काेराेनाचे १४ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुन्हा लांजावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.
मागील चार दिवसांमध्ये तालुक्यात केवळ एकच कोरोनाचा रुग्ण आढळला होता, तर बुधवारी आरटीपीसीआरमध्ये ९ पाॅझिटिव्ह आढळले हाेते. गुरुवारी करण्यात आलेल्या अँटिजन चाचणीत दाेघांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी आरटीपीसीआरमध्ये ३ जण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. तसेच बुधवारी एकाचा मृत्यू झाला आहे. ॲक्टिव्ह रुग्णांमध्येही सध्या वाढ होत आहे. सलग तीन दिवसामध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३८६६ झाली असून, आतापर्यंत ३७१७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या तालुक्यात २२ कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.