शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

अचूक अंदाजासाठी बसविलेल्या ट्रिगरमुळे चुकीचे तापमान, शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 18:27 IST

Temperature, Farmer, Ratnagiri, Agriculture Sector विमा कंपनीने हवामानाच्या अचूक अंदाजासाठी बसविलेल्या ट्रिगरमुळे चुकीचे तापमान नोंदवले जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने फळपीक विमा योजनेंतर्गत रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.

ठळक मुद्देअचूक अंदाजासाठी बसविलेल्या ट्रिगरमुळे चुकीचे तापमानशेतकऱ्यांचे नुकसान

रत्नागिरी : विमा कंपनीने हवामानाच्या अचूक अंदाजासाठी बसविलेल्या ट्रिगरमुळे चुकीचे तापमान नोंदवले जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने फळपीक विमा योजनेंतर्गत रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.आंबा पिकासाठी दिनांक १ डिसेंबर २०२० ते १५ मे २०२१ अखेर अवेळी पाऊस, दिनांक १ जानेवारी २०२१ ते १५ मार्च २०२१ अखेर कमी तापमान, १ मार्च २०२१ ते १५ मे २०२१ अखेर जास्त तापमान तसेच १ फेब्रुवारी २०२१ ते ३१ मे २०२१ अखेर गारपीट झाल्यास विमा संरक्षण दिले जाणार आहे.

काजू पिकासाठी १ डिसेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१पर्यंत अवेळी पाऊस, १ डिसेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ अखेर कमी तापमान, १ जानेवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२१ अखेर गारपीट झाल्यास विमा संरक्षण देण्यात येणार आहे.आंबा पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी सात हजार रुपये तर काजूसाठी पाच हजार रूपये भरावयाचे आहेत. आंबा पिकाला हेक्टरी एक लाख ४० हजार तर काजूसाठी ३३ हजार ३३३ रूपये विमा संरक्षित रक्कम दिली जाणार आहे. कर्जदार, बिगरकर्जदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. यावर्षी पावसाळा लांबल्याने अन्य ऋतू लांबण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमधून फळपीक विमा योजनेचे निकष बदलण्याची मागणी होत आहे.

हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. शेतकऱ्यांसाठी फळपीक विमा योजना राबविताना इथल्या वातावरणाचा अभ्यास करून निकष ठरविणे गरजेचे आहे. मात्र, असे होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. योजनेच्या निकषात बदल करायला हवेत.- राजन कदम,बागायतदार, रत्नागिरी.

टॅग्स :TemperatureतापमानFarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरीAgriculture Sectorशेती क्षेत्र