शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गोठणेतील प्रकल्पग्रस्तांच्या नावांचा संकलन यादीत समावेश करा, मंत्री उदय सामंत यांचे आदेश

By शोभना कांबळे | Updated: July 29, 2023 19:36 IST

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील गोठणे येथील ११८ प्रकल्पग्रस्तांची नावे संकलन यादीत समावेश करावीत, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी ...

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील गोठणे येथील ११८ प्रकल्पग्रस्तांची नावे संकलन यादीत समावेश करावीत, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.चांदोली अभयारण्यामुळे बाधित झालेल्या मौजे गोठणे (ता. संगमेश्वर) येथील प्रकल्पग्रस्तांचे संकलन अद्यावत करण्याबाबत संबंधित विभागाची जिल्हाधिकारी यांच्यासाेबत बैठक आयोजित करावी, अशी मागणी शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना केली होती. त्यानुसार पालकमंत्री सामंत यांनी शनिवारी (२९ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.चांदोली अभयारण्यासाठी बाधित झालेल्या मौजे गोठणे येथील ११८ प्रकल्पग्रस्तांची नावे वाढली आहेत. त्याबाबत प्रकल्पग्रस्तांसमवेत बैठक घेऊन पालकमंत्री सामंत यांनी थेट मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्याशी थेट दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ती नावे तात्काळ यादीत समावेश करण्याचे आणि संबंधितांना निधी देण्याबाबतचा आदेश अपर जिल्हाधिकारी यांना दिला.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला प्रभारी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर आणि प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत