शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

राजापुरातील घटनेने खळबळ : बंद घर फोडून दोन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 16:09 IST

राजापूर शहरामधील चर्मकारवाडीतील सत्यवान रामजी कदम यांचे निवासस्थान सोमवारी रात्री उशिरा फोडण्यात आले. यामध्ये चोरट्यानी देवस्थानच्या सुमारे ८० तोळे चांदीच्या मुकुटासह सोन्याच्या अन्य वस्तू व रोख रक्कम असा अंदाजे दीड ते दोन लाखांचा ऐवज लांबवला.

ठळक मुद्देराजापुरातील घटनेने खळबळ : बंद घर फोडून दोन लाखांचा ऐवज लंपासश्वानपथक अपयशी, अज्ञाताविरोधात गुन्हा, सोने-चांदीचे दागिने पळवले

राजापूर : शहरामधील चर्मकारवाडीतील सत्यवान रामजी कदम यांचे निवासस्थान सोमवारी रात्री उशिरा फोडण्यात आले. यामध्ये चोरट्यानी देवस्थानच्या सुमारे ८० तोळे चांदीच्या मुकुटासह सोन्याच्या अन्य वस्तू व रोख रक्कम असा अंदाजे दीड ते दोन लाखांचा ऐवज लांबवला.

त्यामुळे खळबळ उडाली असून, याप्रकरणी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते. मात्र, तेथूनच काही अंतरावर असलेल्या एसबीआय बँकेपर्यंत श्वान येऊन घुटमळला. त्यामुळे पुढे काहीच तपास झाला नाही.

राजापूर शहरातील चर्मकारवाडीतील नागरिक सत्यवान रामजी कदम हे आपल्या कुटुंबियांसह मुंबईत वास्तव्याला असून, ते एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. अधूनमधून त्यांचे राजापुरात येणे-जाणे असते. शहरातील चर्मकारवाडीत राम निवास हे त्यांचे निवासस्थान आहे. तेथे त्यांची भावजय गीता गंगाराम कदम राहतात. शिवाय रवींद्र शांताराम चव्हाण हे त्यांच्या नात्यातीलच भाडेकरुदेखील त्याच निवासस्थानात राहतात.

सोमवारी सत्यवान कदम यांची भावजय गीता कदम या साळिस्ते (सिंधुदुर्ग) येथे आपल्या मुलीकडे गेल्या होत्या, तर त्यांचे भाडेकरु रवींद्र चव्हाण हे गवाणे (ता. लांजा) येथे पूजेसाठी गेले होते. त्यामुळे रात्री घरी कुणीच नव्हते. नेमक्या त्याच रात्री अंदाजे दीड दोन वाजल्यानंतर सत्यवान कदम यांचे घर फोडले. ही बाब मंगळवारी आजुबाजुच्या लोकांच्या लक्षात आली व झालेला प्रकार पुढे आला.त्यानंतर आजुबाजुच्या मंडळींपैकी कुणीतरी मुंबईत असलेले सत्यवान कदम यांच्याशी संपर्क साधून झाल्या प्रकाराची कल्पना दिली, तर गवाणे येथून थेट आपल्या कामावर गेलेले भाडेकरू रवींद्र चव्हाण यांनाही माहिती देण्यात आली.राजापूर पोलीस ठाण्यात झालेल्या घरफोडीची खबर देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी हजर झाले. रत्नागिरीहून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले.श्वानपथक घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी तपास सुरु केला. कदम यांच्या निवासस्थानाच्या दर्शनी दरवाजाची कडी कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. घरातील प्रत्येक रुममधील कपाटे उघडी पडली होती. आतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते.झालेल्या घरफोडीत कदम यांच्याकडे असलेल्या देवचव्हाटा या देवस्थानचा सुमारे ८० तोळ्यांचा चांदीचा मुकुट, सुमारे पंधरा ग्रॅमच्या सोन्याच्या दोन चेन, सत्यवान कदम व त्यांची भावजय गीता कदम यांच्याकडील प्रत्येकी पंधरा हजारांची रोकड, रवींद्र चव्हाण यांच्या मुलीच्या कानातील तीन ग्रॅमचे सोन्याचे रिंग व साडेसहा हजार रुपये असा अंदाजे दीड ते दोन लाखांचा माल चोरट्यांनी लांबविला आहे.याबाबत पोलिसांचा तपास सुरु होता, जाबजबाब घेण्यात आले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील व त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहेत.दरम्यान, पोलिसांनी खास बोलावलेल्या श्वानपथकाने कदम यांच्या घरापासून माग घेण्याचा प्रयत्न केला. पण त्या घरापासून लगतच असलेल्या एसबीआय बँकेपर्यंत श्वान पोचला व नंतर तेथेच थांबला. त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी तेथून वाहनांनी पोबारा केला असावा, असा कयास आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी