राज्य संगीत नाट्य स्पर्धेचे उद्घाटन

By Admin | Updated: January 16, 2015 23:41 IST2015-01-16T23:27:04+5:302015-01-16T23:41:29+5:30

सिझन तिकीट विक्री

Inauguration of state music drama competition | राज्य संगीत नाट्य स्पर्धेचे उद्घाटन

राज्य संगीत नाट्य स्पर्धेचे उद्घाटन

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईतर्फे ५४व्या महाराष्ट्र राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धेला नुकताच प्रारंभ झाला. यावेळी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे मच्छींद्र पाटील, परीक्षक संजय मराठे, पंडीत विश्वनाथ कान्हेरे, बाळकृष्ण मराठे, बिपीन बंदरकर, नगरसेवक सलील डाफळे, पापय धुळप, कलाकार ओंकार भोजने आदी मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरीतील संगीत क्षेत्रात नावाजलेल्या खल्वायन संस्थेतर्फे सादर करण्यात आलेल्या नांदीने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराज पूजन करण्यात आले. दादा वणजु यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले. शुभारंभाला आश्रय सेवासंस्था, रत्नागिरीतर्फे ‘संगीत मत्स्यगंधा’ हे नाटक सादर करण्यात आले. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नाटक हाऊसफुल होते.मुंबई, नांदेड, गोवा, अहमदनगरसह रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १८ नाटके सादर केली जाणार आहेत. जुनी, गाजलेली एकापेक्षा एक सरस नाटके यावेळी सादर केली जाणार आहेत. १८, २३ व २६ जानेवारी रोजी प्रयोग होणार नाहीत. (प्रतिनिधी)

सिझन तिकीट विक्री
गतवर्षी संगीत राज्य नाट्य स्पर्धेस रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. नाटकांना हाऊसफुलचे बोर्ड लावले होते. यावर्षी नाट्य स्पर्धेच्या सिझन तिकिटांची एकाच दिवशी विक्री ठेवण्यात आली होती. २००हून अधिक तिकिटे स्पर्धेच्या आधीच विकली गेल्याने, यावर्षीदेखील रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

Web Title: Inauguration of state music drama competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.