शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

हरिनामाच्या जयघोषात दुमदुमली रत्नागिरी; गोल रिंगणाचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:43 IST

रत्नागिरी : श्री पांडुरंगाच्या जयघोषात, हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रत्नागिरी शहरातील माळनाका येथील शिर्के उद्यान येथे उभारण्यात आलेल्या २१ फुटी ...

रत्नागिरी : श्री पांडुरंगाच्या जयघोषात, हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रत्नागिरी शहरातील माळनाका येथील शिर्के उद्यान येथे उभारण्यात आलेल्या २१ फुटी श्रीविठ्ठलाच्या मूर्तीचे लाेकार्पण साेमवारी सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. भाविकांनीही विठ्ठल नामाचा जयजयकार केला.महाराष्ट्र शासनाच्या सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत रत्नागिरी नगर परिषदेच्या शिर्के उद्यानाचे सुशोभीकरण करणे या विकासकामातून २१ फुटी विठ्ठल मूर्ती बसविण्यात आली आहे. या मूर्तीचे लोकार्पण सोहळा हभप माधव महाराज शिवणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील, हभप बापूसाहेब महाराज देहूरकर, हभप मनोहर महाराज आवटी, राजेश ओसवाल, नीलेश महाराज, देविदास महाराज, शितोळे सरकार उपस्थित होते.

तत्पूर्वी मारुती मंदिर ते मराठा मैदान अशी वारकरी दिंडी काढण्यात आली. मंत्री सामंतही दिंडीत सहभागी झाले होते. विठू माऊलीच्या जयघोषात वीणा, टाळ मृदंगाच्या तालावर मराठा मैदान येथे गोल रिंगण करण्यात आले. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रमुख शितोळे सरकार यांच्या हिरा व मोती या अश्वांनी रिंगण पूर्ण केले. वारीतील माऊली रथाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले हाेते.त्यानंतर शिर्के उद्यानातील श्रीविठ्ठल मूर्ती ठिकाणी वारकऱ्यांचा मेळा भरला हाेता. पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व कोनशिलेचे अनावरण केले.

वारीची अनुभूतीपंढरपूर येथे वारीनिमित्त वारकरी करीत असलेले गोल रिंगण, रिंगण पूर्ण करणारे मोती व हिरा अश्व, वारीप्रमाणे सहभागी माऊलीचा रथ, टाळ, मृदंगाच्या तालावर वारकऱ्यांचा पांडुरंग नामाचा जयघोष पाहून समस्त रत्नागिरीकरांना प्रथमच वारीची अनुभूती आली. हा क्षण अनेकांनी मोबाइलमध्ये टिपूनही घेतला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी