कुडली येथे कोविड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:22+5:302021-06-30T04:20:22+5:30
आबलोली : गुहागर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली अंतर्गत कुडली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कोविड-१९ विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. ...

कुडली येथे कोविड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन
आबलोली : गुहागर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली अंतर्गत कुडली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कोविड-१९ विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, विद्यमान सदस्य महेश नाटेकर यांच्या हस्ते व सभापती पूर्वी निमुणकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक हरिश कुळ्ये यांनी केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जी. पी. जांगीड यांनी गावातील विलगीकरण कक्षाची उपयुक्तता आणि उपलब्ध आरोग्य सुविधा याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच चैतनी शेट्ये, उपसरपंच संतोष पावरी, सुरेश काजरोळकर, प्रतीक्षा किल्लेकर, राकेश देसाई, अभिजीत शेट्ये यांसह आरोग्य सेवक, आराेग्य सेविका यांच्यासह आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व महिला आदी उपस्थित होते.