भातगाव येथे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST2021-07-10T04:22:32+5:302021-07-10T04:22:32+5:30
आबलोली : गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत भातगाव, ग्रामपंचायत गोळेवाडी व ग्रामपंचायत कोसबीवाडी या तीन ग्रामपंचायतींनी मिळून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक ...

भातगाव येथे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन
आबलोली : गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत भातगाव, ग्रामपंचायत गोळेवाडी व ग्रामपंचायत कोसबीवाडी या तीन ग्रामपंचायतींनी मिळून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भातगाव क्र. १ या मध्यवर्ती ठिकाणी पाच बेडच्या कोविड केअर सेंटरची निर्मिती केली. त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पडवे गटाचे सदस्य महेश नाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कोविड सेंटरमुळे कोरोना रुग्णांची काळजी गावातच घेतली जाणार आहे. कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर यांनी तिन्ही ग्रामपंचायतींचे कौतुक केले. यामुळे तिन्ही गावातील रुग्णांना मध्यवर्ती ठिकाणी प्राथमिक उपचार मिळणार आहेत.
यावेळी सचिन जाधव, सरपंच भातगाव सुशांत मुंडेकर, सरपंच गोळेवाडी रेणुका आग्रे, सरपंच कोसबीवाडी अर्चना वेले, सर्व वाडीप्रमुख, आरोग्य सेवक रवींद्र पाटील, पोलीस पाटील सिद्धोधन मोहिते, भातगाव नं. १ मुख्याध्यापक मनोज जुवेकर, ग्रामसेवक विश्वनाथ पावरा, जयसिंग कांबळे यासह सर्व कर्मचारी, ग्रामस्थ, महिला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा गायकवाड यांनी केले तर आभार ग्रामसेवक व्ही. पी. पावरा यांनी मानले.