लांजात काेविड केअर सेंटरचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST2021-05-25T04:35:10+5:302021-05-25T04:35:10+5:30

लांजा : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने होणारी धावपळ, रुग्णांना उपचारासाठी रत्नागिरी किंवा अन्य ...

Inauguration of Cavid Care Center in Lanjat | लांजात काेविड केअर सेंटरचे उद्‌घाटन

लांजात काेविड केअर सेंटरचे उद्‌घाटन

लांजा : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने होणारी धावपळ, रुग्णांना उपचारासाठी रत्नागिरी किंवा अन्य ठिकाणी जावे लागू नये म्हणून लांजा शहरातील काळे छात्रालय येथे डॉ. भाग्यश्री वीरेंद्र श्रोते यांच्या टीमने काेविड केअर सेंटर उभारले आहे. या सेंटरचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते करण्यात आले.

या काेविड केअर सेंटरमध्ये बारा बेडची सुविधा करण्यात आली असून, त्यामध्ये सात ऑक्सिजन बेड आहेत. यावेळी उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत मणचेकर, उपतालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, जिल्हा बँकेचे संचालक आदेश आंबोळकर, उपनगराध्यक्ष स्वरूप गुरव, सचिन माजळकर, डॉ. वीरेंद्र श्रोते, डॉ. अनिल मोरे, डॉ. अश्विन शिगम, डॉ. दिलीप शिगम, संकेत स्वामी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Cavid Care Center in Lanjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.