शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
3
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
4
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
5
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
6
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
7
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
8
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
9
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
10
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
11
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
12
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
13
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
14
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
15
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
16
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
17
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
18
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
19
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
20
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: पंधरा हजाराची लाच स्वीकारताना आरोग्य सहायक लाचलुचपतच्या जाळ्यात

By शोभना कांबळे | Updated: October 31, 2023 17:57 IST

रत्नागिरी : हॉटेल बांधकामाकरिता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील नाहरकत दाखला देण्यासाठी पंधरा हजार रूपयांची लाच घेणाऱ्या कोतवडे (ता. रत्नागिरी ...

रत्नागिरी : हॉटेल बांधकामाकरिता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील नाहरकत दाखला देण्यासाठी पंधरा हजार रूपयांची लाच घेणाऱ्या कोतवडे (ता. रत्नागिरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक शैलेश आत्माराम रेवाळे, (वय ३८ वर्षे) याला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. त्याच्याकडून ही रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. ३१) रोजी करण्यात आली.तक्रारदार याच्या मालकाच्या हॉटेल बांधकामाकरिता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील नाहरकत दाखला मिळविण्याकरिता तयार केलेला अर्ज स्वीकारण्यासाठी व या कामासाठीची प्रक्रिया पूर्ण करून नाहरकत दाखला देण्यासाठी शैलेश रेवाळे याने २६ आॅक्टोबर २०२३ रोजी पंधरा हजार रूपयांची मागणी केली.तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाकडून मंगळवारी सापळा रचण्यात आला. या जाळ्यात आरोग्य सहायक शैलेश रेवाळे अलगद अडकला. पंचासमोर पंधरा हजार रूपयांची लाच घेताना रेवाळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आले असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी या विभागाचे पोलिस निरिक्षक शहानवाज मुल्ला तपासी अधिकारी म्हणून काम पाहात आहेत.ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर, सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधिक्षक सुशांत चव्हाण यांच्या पर्यवेक्षणाखालील पथकाने ही कामगिरी केली. या पथकात पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला, पोलिस हवालदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, नाईक दिपक आंबेकर, काॅन्स्टेबल हेमंत पवार यांचा समावेश आहे.

रत्नागिरी जिल्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाकडे संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल. - सुशांत चव्हाण, पोलिस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग