शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

नाटे येथील चोरीप्रकरणी चौघांच्या मुसक्या आवळल्या; तिघांना कर्नाटकमधून तर एकाला मुंबईतून अटक 

By अरुण आडिवरेकर | Updated: September 17, 2024 16:59 IST

या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास सुरू होता.

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील चोरीप्रकरणी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चौघांच्या मुसक्या आवळल्या. दीड महिन्यातच या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, तिघांना कर्नाटकमधून तर एकाला मुंबईतून अटक केली आहे.

नाटे बाजारपेठेत २० ऑगस्ट २०२४ रोजी झैद मोबाइल व इलेक्टॉनिक्स या दुकानाचे शटर कोणत्यातरी हत्याराने उचकटवून दुकानातून एकूण ४९ मोबाइल, टॅब व अन्य साहित्य असा एकूण ६,८३,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. दुकान मालक नासिर इब्राहिम काझी (रा. जैतापूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास सुरू होता. गोपनीय माहितीच्या आधारे तसेच नाटे परिसरातील कंत्राटी बांधकाम करणाऱ्या काही व्यक्तींकडे केलेल्या चौकशीमध्ये या गुन्ह्यातील आरोपी हे कर्नाटक व मुंबई येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी लागलीच दोन पथके तयार करून कर्नाटक राज्य व मुंबई या ठिकाणी तपासासाठी पाठविली.कर्नाटकात एका तपास पथकाने करण हाज्याप्पा पुजारी (वय २६, रा. बाजनगर, सुबानाईक तांडा, नलवार, ता. चितापूर, जि. गुलबर्गा, रा. कर्नाटक) आणि राहूल रेड्डी चव्हाण (वय २४, रा. बलराम चौक, तलाई तांडा, जि. चितापूर, जि. गुलबर्गा, रा. कर्नाटक) यांना ताब्यात घेतले. मुंबईमधून  प्रेम सपन कर्माकर (वय २२, रा. मोतीला नगर, नंबर १ रोड, गोरेगाव वेस्ट, दत्त मंदिराजवळ) याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सबन्ना भिमराय कोबळा (वय २४, रा. नलवार, ता. चितापूर, जि. गुलबर्गा, रा. कर्नाटक) याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी एकूण ४,१३,१७७ रुपये किमतीचे ३३ मोबाइल, १ टॅब असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाटे पोलिस स्थानकाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक अविनाश केदारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक तानाजी पवार, पोलिस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, पोलिस हवालदार सुभाष भागणे, शांताराम झोरे, नितीन ढोमणे, बाळू पालकर, विक्रम पाटील, अमित कदम, प्रवीण खांबे, गणेश सावंत, रमिज शेख, चालक पोलिस शिपाई अतुल कांबळे तसेच नाटे पोलिस स्थानकाचे हवालदार राकेश बागुल व पोलिस शिपाई चव्हाण यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस