रस्ते सुधारण्यासाठी ५० कोटी खर्च करणार
By Admin | Updated: June 19, 2014 01:12 IST2014-06-19T01:05:03+5:302014-06-19T01:12:33+5:30
जिल्हा परिषदेकडून ५० कोटी रुपयांचा आराखडा शासनाकडे सादर

रस्ते सुधारण्यासाठी ५० कोटी खर्च करणार
रत्नागिरी : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ८८ किलोमीटर रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे़ त्यासाठी ५० कोटी रुपयांचा आराखडा शासनाकडे जिल्हा परिषदेकडून सादर करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील रस्ते अजूनही खडकाळ, मातीचे असल्याने पावसाळ्यामध्ये जनतेचे हाल होतात. त्यामुळे अनेक गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये एस.टी. वाहतूक बंद होण्याची शक्ता मोठी असते. त्यासाठी ग्रामीण भागातील खेडी प्रमुख रस्त्यांना जोडण्यासाठी ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करण्याची कामे करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ६६ किलोमीटरचे १६ रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. तसेच त्यामध्ये जिल्ह्यातील मोठ्या सात पुलांचाही समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यात शेकडो किलोमीटरचे रस्ते जिल्ह्यात करण्यात आले होते. त्यामुळे अनेक गावांचे रस्ते सुस्थितीत झाले होते. त्यानंतर मध्यंतरी पहिल्या टप्प्याचे काम बंद करण्यात आल्यानंतर पुन्हा या योजनेतून रस्त्यांची कामे करण्यास सुरु होणार आहे. त्यासाठी ८८ किलोमीटर रस्त्त्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. (शहर वार्ताहर)