शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

शेंगदाणा तेल साेडून बाेला; शेंगदाणा दर वाढीचा तेलाच्या किंमतीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 18:46 IST

मेहरून नाकाडे रत्नागिरी : सोयाबीन, सूर्यफूल, सरकी, पाम, कापूस तेलाचा वापर स्वयंपाकासाठी सर्रास केला जात असला तरी शेंगदाणा तेलालाही ...

मेहरून नाकाडेरत्नागिरी : सोयाबीन, सूर्यफूल, सरकी, पाम, कापूस तेलाचा वापर स्वयंपाकासाठी सर्रास केला जात असला तरी शेंगदाणा तेलालाही सर्वाधिक पसंती आहे. काही ग्राहक रिफाईंड तेल वापरत असले तरी घाण्यावरच्या तेलाचा खपही अधिक आहे. शेंगदाणा तेलामुळे पदार्थाची चव वाढते असा खवय्यांचा दावा असल्यानेच शेंगदाणा तेलाचा वापर केला जातो. मात्र गेल्या तीन महिन्यात तेलाच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाली आहे. अन्य तेलाच्या तुलनेत शेंगदाणा तेलाचे दर मात्र अधिक आहेत.

कच्च्या खाद्यतेलावरील आयात कर, कृषीभार (सेस) रद्द करण्यात आल्याने खाद्यतेलाचे दर नियंत्रित आले आहेत.

उत्पादनावरील परिणामामुळे दरवाढ

- इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढत आहे. शिवाय पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनावर परिणाम झाल्याने शेंगदाणा तेलाचे दर अन्य तेलाच्या तुलनेत सरस आहेत.

- सूर्यफूल तेलाचे दर दोनशेच्या घरात गेले होते, मात्र आता दर बऱ्यापैकी नियंत्रणात आहेत. त्यामुळे परवडेल असेच खाद्यतेल ग्राहक वापरत आहेत. सोयाबीन, कापूस, पामतेलाचेही दर खाली आले आहेत.

खाद्यतेलाचे दर (लीटर)

तेल १५ सप्टेंबर १५ ऑक्टाेबर १५ नाेव्हेंबर

शेंगदाणा १८५ ते १९० १७० ते १७५ १७०

साेयाबीन १५५ ते १६० १४० ते १४५ १४०

सूर्यफूल १८० ते १८५ १४५ ते १५५ १५५

सरकी १३० ते १३५ १२५ ते १३० १३०

पाम १४० ते १४५ १२० ते १२५ १२५

कापूस १३५ ते १४० १४० १४०

वेगवेगळे तेल खाणे आराेग्यदायी

- पदार्थाची चव व स्वाद यासाठी शेंगदाणा तेल वापरले जात असले तरी सूर्यफुलाच्या तेलाला ग्राहकांकडून आरोग्यदृष्ट्या पसंती होत आहे.

- कापूस तसेच भाताच्या कोंड्यापासून तयार केलेल्या तेलाचाही वापर करण्यात येतो.

- सोयाबीनच्या तेलालाही वाढती मागणी आहे. मोजमजुरी करणाऱ्या वर्गाकडून पामतेलाचा वापर होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी