शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

महामार्गावरील बोअरवेल ब्लास्टिंग तत्काळ बंद करा, घरांना तडे गेलेल्यांना भरपाई द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 16:01 IST

राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कामातील दगड फोडण्यासाठी बोअरवेल ब्लास्टिंगचा वापर

रत्नागिरी : राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कामातील दगड फोडण्यासाठी बोअरवेल ब्लास्टिंगचा वापर केला जात आहे. त्यामुळे परिसरातील अनेक घरांना तडे गेल्याच्या तक्रारी संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा-मानसकोंड ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केल्या हाेत्या. याची नोंद घेऊन जिल्हाधिकारी यांनी ब्लास्टिंग तत्काळ बंद करा, असे आदेश दिले आहेत. तसेच ज्या घरांना तडे गेले आहेत, त्यांना भरपाई द्या, असेही सांगितले आहे.कुरधुंडा (ता. संगमेश्वर) गावातील राष्ट्रीय महामार्गावरील बोअरवेल ब्लास्टिंगला ग्रामपंचायतीने विरोध करूनही ते बंद करण्यात आले नव्हते. एका वेळी २५ ते ३० पेक्षा जास्त होल अडीचशे फुटांपेक्षा खोल मारून त्या ठिकाणी बोअरवेल ब्लास्टिंग केले जात होते. याचा फटका ग्रामस्थांना बसला असून, गावातील अनेक घरांना तडेही गेले आहेत.

ग्रामस्थांनी या विरोधात आवाज उठवत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार केली हाेती. त्याची दखल घेत पालकमंत्री सामंत यांनी या भागाची पाहणी केली. प्रत्यक्षात लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन त्यावर जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले हाेते.त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी कार्यालयात ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, कंपनीचे अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेऊन ब्लास्टिंग बंद करा, असे आदेश दिले. त्याचबराेबर ज्या घरांना तडे गेले आहेत, त्यांची नुकसान भरपाई द्या, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाबद्दल कुरधुंडा व मानसकोंड ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीला कुरधुंडा ग्रामपंचायतीचे सरपंच सबा अलजी, उपसरपंच तैमुर अलजी, जमूरत अलजी, नाझिमा बांगी, रमजान गोलंदाज, उस्मान मालगुंडकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग