पिंपळवाडी धरणातून अवैध वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:30 IST2021-05-15T04:30:06+5:302021-05-15T04:30:06+5:30
खेड : तालुक्यातील शिरगाव-पिंपळवाडी(डुबी) धरणामुळे अनेक गाव पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत असतानाच जवळपास ८० फुटापर्यंत आटलेल्या धरणातून बेकायदेशीररित्या ...

पिंपळवाडी धरणातून अवैध वाळू उपसा
खेड : तालुक्यातील शिरगाव-पिंपळवाडी(डुबी) धरणामुळे अनेक गाव पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत असतानाच जवळपास ८० फुटापर्यंत आटलेल्या धरणातून
बेकायदेशीररित्या लाखो रुपयांचा अवैध वाळू उपसा वाळू तस्करांनी केला आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने वाळू व्यावसायिकांचे फावले आहे.
शिरगाव ग्रामपंचायतीने विरोध करूनही दिवसाढवळ्या जवळपास २५ ते ३० ट्रॅक्टर वाळू चोरण्यात
आली. ही बाब समजताच ग्रामस्थ व युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सरपंच व उपसरपंच यांनी अवैध वाळू उपसा थांबवण्यासाठी प्रांत, तहसीलदारांना कळवले;मात्र प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही. याबाबत पोलीस
पाटील यांनी कळवूनही कारवाई करणे टाळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वाळू उपसा सुरु असलेल्या धरण क्षेत्रात गेलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना वाळूची तस्करी करणाऱ्यांनी दमदाटी करत पिटाळून लावले. या प्रकरणी शिरगाव ग्रामपंचायत व युवा प्रतिष्ठानने वाळूतस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
------------------------------------
खेड तालुक्यातील पिंपळवाडी धरणातून करण्यात आलेला अवैध वाळू उपसा़