बेकायदा वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST2021-08-29T04:30:56+5:302021-08-29T04:30:56+5:30
गुहागर : तालुक्यातील नरवण पंधरवणेत सुतारवाडी येथे होणारे वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक यामुळे पंधरवणे-सुतारवाडीतील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ...

बेकायदा वाळू उपसा
गुहागर : तालुक्यातील नरवण पंधरवणेत सुतारवाडी येथे होणारे वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक यामुळे पंधरवणे-सुतारवाडीतील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. यामुळे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी जिल्हाधिकारी, गुहागर तहसीलदार, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे.
नवीन रुग्णवाहिका
जाकादेवी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांच्या विशेष प्रयत्नातून वाटद-खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मिळाली आहे. जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा जाधव, सभापती संजना माने, वाटद सरपंच अंजली विभुते यांच्याहस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
खेडमध्ये अनधिकृत खोके
खेड : नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या गैरहजेरीत स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रासमोरील आणि वाचनालयाच्या शेजारी सुपर मार्केटमध्ये खोके उभे राहत आहेत. हे खोके अधिकृत की अनधिकृत? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
विद्यार्थी, पालक बाधित
चिपळूण : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तालुकावासीयांसह आरोग्य विभागाची चिंता वाढविणारी घटना दुर्गवाडी येथे घडली आहे. गेल्या तीन दिवसांत या गावामध्य १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये १० विद्यार्थ्यांसह ४ पालकांचा समावेश आहे. सुदैवाने, बाधितांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत.
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
दापोली : श्री गणेश विसर्जन घाट आणि दापोली शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र पेठकर यांनी दापोली नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. दापोली नगर पंचायतीच्या हद्दीतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. ते तत्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.