इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये नियमबाह्य ब्लॅचिंग प्लँट, क्रशर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST2021-09-11T04:32:44+5:302021-09-11T04:32:44+5:30
रत्नागिरी : इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये असतानाही ब्लॅचिंग प्लँट व क्रशरसाठी संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी दिलेला ना हरकत दाखला ...

इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये नियमबाह्य ब्लॅचिंग प्लँट, क्रशर
रत्नागिरी : इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये असतानाही ब्लॅचिंग प्लँट व क्रशरसाठी संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी दिलेला ना हरकत दाखला नियमबाह्य असल्याने तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने शासनाकडे केली आहे.
संभाजी ब्रिगेडने या मागणीचे निवेदन कुरधुंडा ग्रामपंचायतीसह जिल्हाधिकाऱ्यांनाही सादर केले आहे. नॅशनल हायवे क्रमांक ६६ या महामार्गाचे आरवली ते तळेकांटे या दरम्यानचे काम जे. एम. म्हात्रे या कंपनीला मिळाले आहे. या कंपनीने कुरधुंडा, गावमळा येथे जागा घेऊन त्या ठिकाणी ब्लॅचिंग प्लँटचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे. हे गाव इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून शासनाने जाहीर केले आहे. तरीही ब्लॅचिंग प्लँटसाठी ना हरकत दाखला देण्यात आला आहे. हे गाव इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येत असल्याने सरपंचांनी कोणत्या निकषाच्या आधारे ना हरकत दाखला देण्यात आला, याची माहितीची संभाजी ब्रिगेडने मागणी केली आहे.
जे.एम. म्हात्रे कंपनीला सरपंच यांनी स्वमालकीच्या जागे प्रत्येक महिन्याला ५० हजार रुपये भाड्याने दिली आहे. ना हरकत दाखला देताना सरपंचांनी स्वत:चा आर्थिक फायदा जपल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. कंपनीकडून सरपंचांनी आपल्या हद्दीत रस्त्याच्या बाजूलाच काळ्या दगडाला बोअर मारून नियमबाह्य ब्लास्टिंग करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ब्लास्ट थांबविण्यात यावे. त्याचबरोबर कंपनीला दिलेला नाहरकत दाखला रद्द करून ते प्लँट बंद करण्याची मागणीही करण्यात आली आहे.