डोनेशन घेणाऱ्या संस्थांकडे दुर्लक्ष

By Admin | Updated: July 10, 2014 00:00 IST2014-07-09T23:33:38+5:302014-07-10T00:00:42+5:30

शासन निर्णयाचे उल्लंघन

Ignore the donation agencies | डोनेशन घेणाऱ्या संस्थांकडे दुर्लक्ष

डोनेशन घेणाऱ्या संस्थांकडे दुर्लक्ष

चिपळूण : राज्य शासनाने डोनेशन घेण्यास बंदी केली असली तरी सर्वच शिक्षण संस्थांमध्ये डोनेशन घेऊन प्रवेश दिला जात आहे. मात्र, शिक्षण खात्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
रिपब्लिकन सेनेने नुकतीच बैठक घेऊन प्रवेश प्रक्रियेच्यावेळी महाविद्यालयाने डोनेशन घेऊ नये, असा निर्णय घेतला होता. डोनेशन घेणाऱ्या महाविद्यालयांच्या प्रशासनावर धडक देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डीबीजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम जोशी, आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य मोरे,शिक्षण विस्तार अधिकारी राज अहमद देसाई यांची शनिवारी भेट घेऊन प्रवेश प्रक्रियेच्या वेळी पैसे घेऊ नयेत. सर्वसामान्य विद्यार्थ्याला त्याच्या गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावा, अशी मागणी केली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ती मान्य केली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख महेंद्र कदम, तालुकाप्रमुख गौतम जाधव, उदय कदम, जिल्हा सरचिटणीस सुशांत जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Ignore the donation agencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.