वेतन न मिळाल्याने विघ्नहर्त्याला साकडे
By Admin | Updated: September 17, 2015 23:47 IST2015-09-17T23:22:08+5:302015-09-17T23:47:27+5:30
मांडकी नळपाणी योजना : कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

वेतन न मिळाल्याने विघ्नहर्त्याला साकडे
चिपळूण : मांडकी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना, चिपळूण या योजनेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव आला तरी गेले सहा महिने वेतन मिळालेले नाही. गणपती सणासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासू नये म्हणून कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सात गावच्या सरपंच, उपसरपंच, पाणी पुरवठा अध्यक्ष, कर्मचारी यांची संयुक्त बैठक आगवे ग्रामपंचायतीत घेण्यात आली. या बैठकीला सात गावचे सरपंच, उपसरपंच, पाणी पुरवठा अध्यक्ष, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या योजनेचे शिल्पकार माजी विधानसभा अध्यक्ष दत्ताजी नलावडे यांच्या प्रतिमेला शंकर डिके यांनी पुष्पहार घातल्यानंतर बैठकीला सुरुवात करण्यात आली. आगवे ग्रामपंचायतीच्या सरपंच स्नेहा राणीम यांनी अध्यक्षस्थान भूषविले. कर्मचाऱ्यांच्यातर्फे मांडकी येथील अनंत पवार यांनी चर्चेत भाग घेतला. सात गावच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या अडीअडचणी समजावून घेतल्या व तक्रारींची शहानिशा करुन आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करु असे आश्वासन पवार यांना दिले. यासाठी एक कमिटी नेमण्यात आली आहे. या बैठकीला असुर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंच सत्यवती बने, पाणी पुरवठा अध्यक्ष सुभाष गुरव, आगवे ग्रामपंचायतीच्या सरपंच स्नेहा राणीम, उपसरपंच राजेंद्र चव्हाण, पाणी पुरवठा अध्यक्ष श्रीराम हुमणे, मांडकी खुर्दचे सरपंच संतोष गुडेकर, उपसरपंच संजय धुमक, मांडकी बुद्रुकचे उपसरपंच प्रदीप काजारे, पाणी पुरवठा अध्यक्ष विठू लोंढे, दहिवली खुर्दचे सरपंच एकनाथ तांबे, उपसरपंच दिनेश कदम, दहिवली बुद्रुकचे सरपंच सुहास पांचाळ, उपसरपंच रुपेश घाग, खरवते सरपंच मनीषा घाग, उपसरपंच श्रीराम घाग, ग्रामस्थ अमित कदम व प्रमोद खेडेकर उपस्थित होते. नळपाणी योजनेतील कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराविषयी आम्ही प्रयत्न करु तसेच त्यांच्या अन्य असलेल्या समस्याही मिटवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन यावेळी उपस्थितांनी दिले. आगवे गावच्या पाणी पुरवठयाचे अध्यक्ष हुमणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कमिटीची स्थापना--दहिवली बुदु्रकचे उपसरपंच रुपेश घाग यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्यात आली. कमिटीचे उपाध्यक्ष आगवे उपसरपंच राजेंद्र चव्हाण, सचिव मांडकी खुर्दचे उपसरपंच संजय धुमक व असुर्डेच्या सरपंच सत्यवती बने यांची नियुक्ती करण्यात आली. प्रमोद खेडेकर, मांडकी, संतोष साळवी, असुर्डे सर्व सरपंच, उपसरपंच व ग्रामीण पाणी पुरवठ्याचे अध्यक्ष या कमिटीचे सदस्य आहेत.