शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मर्दाची अवलाद असाल, धमक असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, भास्कर जाधवांचे शिंदे गटाला आव्हान

By मनोज मुळ्ये | Updated: September 3, 2022 19:05 IST

कधी कंगना राणावत, कधी भोंगा, हिजाब, सुशांतसिंह राजपूत, नुपूर शर्मा यांना पुढे करून दंगल घडवायचे व सरकार पाडायचे असा अयशस्वी प्रयत्नही भाजपने केला.

संकेत गोयथळेगुहागर : राज्यात दंगली घडवून सरकार पाडण्याचा अयशस्वी प्रयत्न भाजपने केला. मर्दाची अवलाद असाल, तुमच्यात धमक असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या. तुम्ही सच्चे आहात की बदमाश हे जनतेला ठरवू द्या, असे थेट आव्हान शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला दिले. छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन लवकरच रायगड जिल्ह्यातून आपण महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करणार असल्याचेही ते म्हणाले.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुका शिवसेनेतर्फे मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल या मेळाव्यात आमदार जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी शिंदे गटावर तोफ डागली.ते म्हणाले की, या सरकारने आमचं सरकार आलं आणि सण सुरू झाले असे बोर्ड लावले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात केलेल्या यशस्वी कामगिरीमुळेच आपले सण आज चांगल्या प्रकारे साजरे होत आहेत. उलट कोरोना काळात मुंबईकरांना गावाकडे येऊ नये, अशीच भूमिका येथील भाजप नेत्यांनी घेतली होती. शिवसेना व ठाकरे हे अतूट नाते आहे ते कोणीही तोडू शकत नाही भाजपला तुम्ही फक्त सत्तेपुरते हवे आहात.सर्वधर्मसमभावाचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली म्हणूनच आज मुस्लिम समाज आमच्यासोबत येत आहे व हेच वातावरण भाजपला अस्वस्थ करत होते. कधी कंगना राणावत, कधी भोंगा, हिजाब, सुशांतसिंह राजपूत, नुपूर शर्मा यांना पुढे करून दंगल घडवायचे व सरकार पाडायचे असा अयशस्वी प्रयत्नही भाजपने केला.यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र सुर्वे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, महेश नाटेकर, प्रवीण ओक, विनायक मुळे, सचिन बाईत, जयदेव मोरे, विलास गुरव, संजय पवार उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBhaskar Jadhavभास्कर जाधवEknath Shindeएकनाथ शिंदे