खड्डे न भरल्यास वृक्षारोपण करणार : संजय कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:34 IST2021-09-26T04:34:04+5:302021-09-26T04:34:04+5:30
दापोली : दापोली विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक बांधकाम विभाग व रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मालकी रस्त्याची अवस्था दयनीय ...

खड्डे न भरल्यास वृक्षारोपण करणार : संजय कदम
दापोली : दापोली विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक बांधकाम विभाग व रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मालकी रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. हे सर्वच रस्ते दसऱ्यापूर्वी सुस्थितीत व्हावेत, यासाठी माजी आमदार यांनी संबंधितांना लेखी पत्रव्यवहार केला आहे. जर दसऱ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे भरले गेले नाहीत तर राष्ट्रवादीतर्फे याच खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी आमदार संजय कदम यांनी दिला आहे.
दापोली तालुक्यातील सर्वच मार्गांवर भलेमोठे खड्डे पडले आहेत. तसेच दापोली - मंडणगड, दापोली - खेड या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे दसरा-दिवाळीपूर्वी हे रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, लोकांना नाहक बळी पडावे लागत आहे. कित्येकांचे प्राणसुद्धा जात आहेत.