जि.प.च्या दहा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:32 IST2017-09-04T23:32:45+5:302017-09-04T23:32:45+5:30

Ideal Teacher Award for 10 teachers of ZP | जि.प.च्या दहा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

जि.प.च्या दहा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार



लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या दहा शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण सभापती दीपक नागले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. पुरस्कार वितरणाची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
दरवर्षी ५ सप्टेंबर या शिक्षक दिनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे उत्कृष्ट काम करणाºया शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. प्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकाची यासाठी निवड करण्यात येते.
यावर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पुरस्कारासाठी २५ प्रस्ताव प्राप्त झाले होते. निवड समितीने त्यापैकी दहा शिक्षकांची निवड करून यादी अंतिम मंजुरीसाठी कोकण आयुक्त यांच्याकडे पाठवली होती. ती त्यांनी मंजूर केली आहे. यावर्षी ५ सप्टेंबरला सुटी असल्यामुळे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नंतर घेतला जाणार आहे. त्याची तारीख मागाहून जाहीर करण्यात येईल. प्रमाणपत्र व ५०० रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे, असे नागले यांनी सांगितले.

 

Web Title: Ideal Teacher Award for 10 teachers of ZP