शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

तरीही माझी नाहक बदनामी, आरोप करणाऱ्यांना न्यायालयात खेचणार; 'या' प्रकरणावरुन भास्कर जाधवांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 13:26 IST

कोकरे महाराज यांच्या मागील बोलविता धनी कोण?

चिपळूण : आपण स्वतः शेतकरी व गाई, म्हशींचे पालन करीत असल्याने गो शाळेला विरोध करणे माझ्या पिंडात नाही. सोनगावमधील गो शाळेचा मला कसलाही त्रास नाही. येथील गाे शाळेला माझा कधीच विराेध नव्हता. तरीही नाहक माझी बदनामी केली जात आहे. आरोप करणाऱ्यांना मी न्यायालयात खेचणार आहे, असा इशारा गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शुक्रवारी (३ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले की, महामार्गावर सातत्याने गो हत्या होत होत्या, त्यात विशिष्ट समाजाचे लोक संशयित म्हणून सापडत होते. यातून जातीय दंगली घडू शकतात म्हणून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी लक्षवेधी मी मांडली होती. भगवान कोकरे महाराज यांच्या गो शाळेचा लक्षवेधीमध्ये उल्लेखही केलेला नाही. त्यानंतर महामार्गावर होणाऱ्या गो हत्या बंद झाल्या. त्यामुळे कोकरे महाराज यांनी माझे अभिनंदन करायला हवे होते, पण तसे न करता ते माझ्या विरोधात सातत्याने आरोप करत आहेत.सोनगावमधील गो शाळेला अनुदान मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले. गो शाळेच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मी कधीच कोणत्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला नाही. माझीही भूमिका मी पूर्वीही मांडली आहे. गणपती विसर्जनावेळी गावातील ग्रामस्थ आणि कोकरे महाराज यांचा वाद झाला. मला त्याची माहिती नव्हती. कारण त्यावेळी मी गावी होतो. कोकरे महाराज आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वादात राजकीय स्वार्थापोटी मला ओढले जात आहे.कोकरे महाराज यांच्या मागील बोलविता धनी कोण आहे, मला माहीत आहे. चाळीस वर्षांत मला घेरण्याचा प्रयत्न झाला त्यातही मी कधी कुणाला गावलो नाही. मी शिवसेनेत आलो म्हणून गो शाळेला विरोध करणारे लोक माझे कार्यकर्ते झाले. पण लोटे येथे दंगल झाली, तेव्हा हे कार्यकर्ते शिवसेनेत आणि मी राष्ट्रवादीत होतो. तेव्हा ते कार्यकर्ते रामदास कदम यांचे होते आणि तेव्हा माझी भूमिका लोकहिताची होती, असेही आमदार जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBhaskar Jadhavभास्कर जाधव