बहुजन पाॅवर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी हुसेन तडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:27 IST2021-04-03T04:27:50+5:302021-04-03T04:27:50+5:30

०२हुसेन तडवी.जेपीजी लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे हुसेन तडवी यांची निवड करण्यात आली. ...

Hussein Tadvi as President of Bahujan Power Employees Union | बहुजन पाॅवर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी हुसेन तडवी

बहुजन पाॅवर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी हुसेन तडवी

०२हुसेन तडवी.जेपीजी

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे हुसेन तडवी यांची निवड करण्यात आली. नाशिक येथे झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादितच्या अखत्यारित बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेची राज्य कार्यकारिणी व प्रादेशिक कार्यकारिणीची सभा नाशिक येथे पार पडली. राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष तुषार जाधव यांनी, महावितरण कर्मचारी अहोरात्र मेहनत करून वसुलीचे कामकाज करीत असताना, त्यांना कर्तव्य बजावत असतानाही मारहाणीसारख्या झालेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला.

यावेळी रत्नागिरी परिमंडलाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत हुसेन तडवी यांची परिमंडल अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. ही नेमणूक केंद्रीय सरचिटणीस राजन शिंदे, केंद्रीय उपाध्यक्ष तुषार जाधव, प्रादेशिक अध्यक्ष मुकेश गजभिये, मंडल अध्यक्ष विजय चव्हाण, कोकण प्रादेशिक सदस्य बाळकृष्ण झोरे, रोहिणी साळसकर, स्वप्नाली केदार, तसेच राज्यातील विविध परिमंडल, मंडल, विभागीय सदस्य यांच्या उपस्थितीत झाली.

Web Title: Hussein Tadvi as President of Bahujan Power Employees Union