शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील भाजी विक्रेत्याचा राजापूर येथे अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 22:13 IST

राजापूर गंगा तिठा येथे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील निखिल साळुंखे भाजी विक्रीसाठी बसले हाेते, तर नकुशा मासाळ व उज्ज्वला सरगर तेथेच जेवण करत बसल्या हाेत्या.

राजापूर : रस्त्याच्या बाजूला भाजी विक्रीसाठी बसलेल्या भाजी विक्रेत्याच्या अंगावर कंटेनरचा फाळका पडून झालेल्या अपघातात गाडीचा चालक निखिल पोपट साळुंखे (वय ३२, रा. आष्टा, सांगली) हे जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबत असणाऱ्या नकुशा प्रकाश मासाळ (रा. सांगली) या गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर गंगा तिठा येथे बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची माहिती उज्ज्वला भारत सरगर (२५) यांनी पाेलिसांना दिली.

राजापूर गंगा तिठा येथे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील निखिल साळुंखे भाजी विक्रीसाठी बसले हाेते, तर नकुशा मासाळ व उज्ज्वला सरगर तेथेच जेवण करत बसल्या हाेत्या. याचदरम्यान महामार्गावर कंटेनर (एचआर ५५, वाय ६१०८) हा गोव्याकडून मुंबईकडे चालला होता. हा कंटेनर कादीर कशौत अली (३६, रा. तिलजा, ता. समरीयाना, संत कबीरनगर, उत्तर प्रदेश) हा चालवीत होता. भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला आणि उन्हाळे येथील अवघड वळणावर कंटेनरला अपघात झाला. त्यावेळी कंटेनरचा फाळका तुटला व भाजी विक्रीसाठी बसलेल्या निखिल साळुंखे यांच्या अंगावर जाऊन पडला. अचानक घडलेल्या प्रकाराने त्यांना पळण्याचीही संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या नकुशा प्रकाश मासाळ या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.अपघातानंतर पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी निखिल साळुंखे हे मृत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कंटेनरचालक कादीर शौकत अली याच्यावर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वेंगुर्लेकर अधिक तपास करीत आहेत.

अनेक वर्षे भाजी विक्री

नकुशा या गेली अनेक वर्षे सांगली येथून स्वतः बोलेरो पिकअप्‌मध्ये भाजी भरून घेऊन कोकणात येऊन त्याची विक्री करतात. त्या स्वतः गाडी चालवितात. त्यांनी गेल्या अनेक वर्षांत कधीही अपघात केलेला नाही. मात्र, या विचित्र अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारार्थ कोल्हापूरकडे हलविण्तया आले आहे. कंटेनर चालक कादीर शौकत अली याला रत्नागिरीमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

दाेन दिवसांपूर्वी राजापुरातसांगलीतील हे कुटुंब भाजी विक्रीसाठी काेकणात येते. राजापूर येथे दाेनच दिवसांपूर्वी ते भाजी विक्रीसाठी आले हाेते. गंगा तिठा येथे भाजीचा स्टाॅल ते मांडतात. मात्र, रस्त्यावरून जाणारा कंटेनर त्यांच्यासाठी काळ बनून आला आणि त्यातच ही दुर्दैवी घटना घडली.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी