सावर्डेतील अपघातात पती-पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:35 IST2021-09-12T04:35:55+5:302021-09-12T04:35:55+5:30

चिपळूण : सावर्डे ते कोसबी मुंढे रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातात ...

Husband and wife injured in accident in Savarde | सावर्डेतील अपघातात पती-पत्नी जखमी

सावर्डेतील अपघातात पती-पत्नी जखमी

चिपळूण : सावर्डे ते कोसबी मुंढे रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातात दोघे जखमी झाले असून, या प्रकरणी धडक देणाऱ्या दुचाकीस्वारावर सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल गुरव असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याबाबतची फिर्याद शशांक यशवंत जोशी (३०, रा.नांदगाव) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी हे आपल्या दुचाकीने सावर्डे ते कोसबी रस्त्यामार्गे नांदगाव मुंढे या रस्त्याने जात होते. त्यावेळी ते डेरवण रस्त्याच्या एका चढावाच्या सुरुवातीला आले असता, भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येऊन जोरदार धडक दिली. या अपघातात जोशी यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रियंका जोशी याही जखमी झाल्या आहेत. या अपघाताच्या ठिकाणी धडक देणारा दुचाकीस्वार त्या ठिकाणी न थांबता तो पळून गेला.

Web Title: Husband and wife injured in accident in Savarde