आधारकार्डसाठी शोधाशोध

By Admin | Updated: July 28, 2014 23:26 IST2014-07-28T23:09:20+5:302014-07-28T23:26:50+5:30

महा-ई सेवा केंद्र : साडेसात लाख लोकांची आधारकार्ड पूर्ण

Hunt for Aadhar card | आधारकार्डसाठी शोधाशोध

आधारकार्डसाठी शोधाशोध

रत्नागिरी : आधारकार्डची सक्ती मध्यंतरी शिथिल करण्यात आल्याने नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे प्रशासनातर्फे सुरू असलेल्या महा-ई सेवाकेंद्रांमध्ये ही सेवा सुरू असूनही त्याबाबत लोकांमध्ये उदासीनता दिसून येत होती. मात्र, आता पुन्हा आधारकार्ड सक्तीचे करणार असल्याचे संकेत मिळू लागताच नागरिकांची शोधाशोध सुरू झाली आहे.
राज्यातील आधारकार्डचे काम करण्यासाठी शासनाने ग्लोडाईन या कंपनीकडे काम दिले होते. पण, पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्याचे केवळ ३५ टक्के काम झाल्यानंतर या कंपनीने काम अचानक सोडून दिले. १२ जानेवारी २०११ ते ३१ मार्च २०१२ या कालावधीत जिल्ह्यातील १६,१२,६७२ लोकसंख्येपैकी केवळ ६,४३,५८२ एवढ्याच लोकांचे आधारकार्डचे काम झाले होते. त्यानंतर विविध शिष्यवृत्ती, विविध योजनांचे अनुदान, गॅस सिलिंडरची सबसिडी आदींसाठीही आधारकार्ड सक्तीचे केल्यामुळे नागरिकांची धावपळ सुरू झाली.
पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यातील काम जिल्ह्यातील ३० महा-ई सेवा केंद्रांकडे दिले आहे. याअंतर्गत फेब्रुवारी २०१३ ते जुलै १४ पर्यंत जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार नागरिकांच्या आधारकार्डचे काम करून दिले. त्यामुळे आतापर्यंत सुमारे साडेसात लाख इतक्या लोकांचे आधारकार्डचे काम झाले आहे.
मात्र, अजूनही नागरिकांना या सेवा केंद्रांबाबतची माहिती नसल्याने आधारकार्ड काढण्याबाबत उदासीनता असल्याचे दिसत आहे. दरम्यान, या ३० सेवा केंद्रांपैकी चार सेवा केंद्र सध्या तात्पुरती बंद स्वरूपात आहेत. उर्वरित २६ महा - ई सेवा केंद्रात सध्या आधारकार्ड सेवा सुरू आहे.
काही भागातील नागरिकांना आपल्या भागात असलेल्या महा-ई सेवा केंद्राबाबत माहितीच नसल्याने अशा सेवाकेंद्रांमध्ये आधारकार्ड काढण्यासाठी अल्प प्रतिसाद मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या महा-ई सेवा केंद्रांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
आधारकार्डची सक्ती करूनही नागरिक या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे समोर येत आहेत. (प्रतिनिधी)
चिपळूण :पेठमाप२इब्राहिम कॉम्प्लेक्स१
सावर्डे :सावर्डे बाजारपेठ१पिंपल मोहल्ला१
दापोली :वाकवली२हर्णै१
फणसू१
गुहागर :खोडदे२शृंगारतळी१
खेड :२लांजा :१
राजापूर :राजापूर पोलीस स्टेशन१पाचल१
रत्नागिरी :जयस्तंभ१लाला कॉम्प्लेक्स१
पऱ्याची आळी१मुरूगवाडा१
नाचणे१पावस बाजारपेठ१
वाटद (खंडाळा)१कोतवडे बाजारपेठ१
चांदेराई१हातखंबा१

Web Title: Hunt for Aadhar card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.